- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, मराठा महासंघाचा बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा, महाराष्ट्र राज्य मराठा महासंघाचे अध्यक्ष दीपक मोहिते,यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांची आज जुने विवा महाविद्यालय येथे भेट घेवून आपले समर्थन व सक्रिय पाठिंबा दिला.यावेळी अध्यक्ष दीपक मोहिते,यांनी विरार,नालासोपारा व बोईसर तालुक्यातील मराठा समाजाच्या मतदारांनी आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांना या निवडणुकीत भरभरून मते द्यावीत,असे आवाहन केले. बहुजन विकास आघाडीला सक्रिय पाठिंबा दिल्यानंतर महासंघाचे पदाधिकारी वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघातील मराठा मतदारांना प्रत्यक्ष भेटून आपला मराठा तरुण,महिला व ज्येष्ठ मराठा नागरिकांना भेटून आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन…
दीपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर हेच आम्हा वसईकरांचे राष्ट्रीय नेते, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.प्रचाराच्या दुसऱ्या टप्यात लहान मोठ्या सभा व जाहीरसभा पार पडणार आहेत. जाहीर सभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना पाचारण करण्यात येणार आहे.त्यामध्ये अमित शहा,योगी आदित्यनाथ,राजनाथसिंह,जे.पी.नड्डा,उद्धव ठाकरे,बाळासाहेब थोरात,नाना पटोले,शरद पवार,यांचा समावेश आहे.तसेच अनेक सेलिब्रिटीज देखील हजेरी लावणार आहेत.विविध पक्षाचे रथी – महारथी जिल्ह्यात येत असताना आ.हितेंद्र ठाकूर हे मात्र एकहाती किल्ला लढवणार आहेत.त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर हेच आमचे राष्ट्रीय नेते व सेलिब्रिटीज आहेत.त्यामुळे आम्हाला बाहेरून कोणाला बोलावण्याची गरज नाही.गेली तीस वर्षे आ.हितेंद्र ठाकूर हे प्रचाराची धुरा…
दीपक मोहिते, राजेश पाटील यांची प्रचारात आघाडी,मतदारांचा वाढता प्रतिसाद, बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी बोईसर व पालघर पूर्व भागात गेल्या तीन दिवसात धुवांधार प्रचार केला.या प्रचारादरम्यान लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधी पक्षाच्य उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.राजेश पाटील यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना पुरुष व महिला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. बोईसर विधानसभेचे आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी या परिसरातील प्रत्येक गावात विकासकामांची गंगा आणली आणली. या भागांतील ग्रामस्थांचे दैनंदिन जीवनातील प्रश्न व समस्यांचे त्यांनी निराकरण केले.तसेच विधानसभेच्या पटलावर मांडून सरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले.त्यामुळें हा संपूर्ण परिसर विकासाच्या मार्गावर…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, १३२ नालासोपारा विधानसभा ; आ.क्षितिज ठाकूर या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेतील, गेल्या सात दिवसांपासून पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला आहे.उमेदवार,पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असताना घामाच्या धारांनी ओथंबून गेलेले कार्यकर्ते आपापल्या उमेदवारासाठी जीवाचे रान करत आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात बविआ -०३,राष्ट्रवादी काँग्रेस,( उबाठा,) -०१,मार्क्स.कम्यू.-०१ व शिवसेना ( शिंदे गट,) असे बलाबल आहे.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बविआचे आ.क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात भाजपने राजन नाईक यांना रिंगणात उतरवले आहे.यापूर्वीही नाईक यांनी आपले नशीब अजमावले होते,पण त्याना त्यावेळी तीसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले…
दीपक मोहिते, वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा,आ.हितेंद्र ठाकूर यांनी घेतली भेट, वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इटलीच्या व्हॅटीकन सिटीचे बिशप पोप यांनी ही नियुक्ती जाहीर केली.वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्हा हा वसई बिशप हाऊसच्या अखत्यारित येतो.वसई धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मच्याडो यांच्या निवृत्तीनंतर हे पद जून २०२४ नंतर रिक्त होते.२००९ पासून फेलिक्स मच्याडो हे बिशपपद सांभाळत होते.नवीन बिशपच्या नियुक्तीची प्रक्रिया गेल्या ५ महिन्यांपासून सुरू होती.यासाठी ३ नावांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. काल दुपारी इटलीच्या व्हॅटीनक सिटी येथील बिशप पोप यांनी वसई धर्मप्रांतांच्या प्रमुखपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा ( ५२ ) यांची नियुक्ती…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीचे आमदार सध्या भितीच्या सावटाखाली आले आहेत… महाराष्ट्र राज्य आपल्या हातून निसटणार,या भितीमुळे मोदी व शहा या जोडगोळीची सध्या झोप उडाली आहे.उद्धव ठाकरे व शरद पवार या दोघांनी महायुतीची ” पळता भुई थोडी,” केली आहे.या दोघांच्या जाहीर सभांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांचीही त्रेधातिरपिट उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले असून त्यांच्या टीकेची धार सतत वाढत आहे.ज्या आक्रमक पद्धतीने उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोघे महायुतीच्या कारभारावर हल्ले चढवत आहेत,ते पाहून महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.अनेक उमेदवारांना…
दीपक मोहिते, विरोधी पक्षाचे उमेदवार …..पाय लावून का पळ काढतात ? वसई तालुक्यातील नावाजलेली सामाजिक संस्था अशी ओळख असलेली जागरूक नागरिक संस्था,ही निवडणुकीच्या काळात परिसंवादाचे आयोजन करत असते.आयोजक या परिसंवादात निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना एकमेकांशी चर्चा करणे व आपली मते परखडपणे मांडकण्यासाठी पाचारण करत असते.या परिसंवादात उमेदवारांनी आपली उमेदवारी कशासाठी ? यावर आपली मते मांडणे व भविष्यात वसईतील जनतेसाठी काय करणार आहोत ? यावर आपले म्हणणे मांडणे,अशी या उपक्रमा मागची संकल्पना आहे. काल सांयकाळी वसई गावातील न्यू इंग्लिश स्कूल येथे हा उपक्रम संस्थेने आयोजित केला होता.वसईचे आ.हितेंद्र ठाकूर हे या कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहिले.मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील…
दीपक मोहिते, कुणबी सेना आणि आगरी कोळी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा, पालघर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या प्रचारातबहुजन विकास आघडीने प्रचंड आघाडी घेतली आहे.त्यामुळे विरोधी पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात आश्चर्यकारक घटना घडत आहेत.कुणबी व आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ.हितेंद्र ठाकूर यांची विरार येथे भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.काही मातब्बर उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत.त्यामुळे विरोधी पक्षाचे धाबे दणाणले आहे.या घडामोडीमुळे भयभीत झालेल्या एका राष्ट्रीय पक्षाने जागावाटपाच्या धर्तीवर आता पैसेवाटप करण्याचा उद्योग सुरू केला आहे.जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडी या प्रमुख पक्षास ठाणे आणि पालघर…
दीपक मोहिते, स्थिर पथकाकडून वाडा येथे ३ कोटी ७० लाखाची रोख रक्कम जप्त, वाडा विक्रमगड मार्गावरील पाली येथे काल सायंकाळी आलोंडे या गावाकडून वाडा येथे येणा-या एम एच ४३ सीई ४०५१ या क्रमांकाच्या पिकअपला स्थिर पथकाकडून रोखण्यात आले व वाहनांची तपासणी केली असता सदर पिकअपमध्ये ३ कोटी ७० लाख ५० हजार रू.ची रोख रक्कम आढळून आली.पथकाने ती जप्त केली आहे.या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.ही रोख रक्कम नक्की कुणाची आहे,याविषयी तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. स्थिर पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेची निवडणूक सुरू असून निवडणूक आयोगाकडून विविध नाक्यांवर तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.विक्रमगड-वाडा मार्गावरील पाली फाट्याजवळही असेच पथक तैनात करण्यात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर विधानसभा ; महायुतीचे राजेंद्र गावित सध्या अडचणीत आले आहेत, पालघर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मुरबे गावात प्रचार करताना मच्छीमार समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.या गावात स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला.राजेंद्र गावित यांचे ज्या जिंदाल उद्योग समूहाशी घनिष्ट संबंध आहेत,त्या समूहाला या गावात बंदर उभारणीसाठी गावित यांनी मदत केली,असा आरोप मच्छीमार समाजाकडून करण्यात येत आहेत. वाढवण बंदर प्रकल्प उभारणी बाबतही याच गावित यांची भूमिका संशयास्पद होती. त्यावेळी खासदार असलेल्या राजेंद्र गावित हे या बंदरासंदर्भात तोंडातून चकार शब्द काढत नसत.त्यामुळे त्यांच्यावर मांगेला व माच्छी समाजामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.ही नाराजी त्यांना…
