- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विनोद तावडे यांना अवदसा आठवली,कार्यकर्त्यांच्या अक्षरशः हातापाया पडावे लागले, बेगडी हिंदुत्वाचा मुखवटा लावून फिरणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या काळाकुट्ट चेहऱ्यावरचा मुखवटा विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी टराटरा फाडला.भाजपच्या नेत्यांनी निदान आता तरी साधनशुचितेच्या गोष्टी करणे,सोडून द्यावे.भाजप निवडणुका कसे जिंकते ? हे बहुजन विकास आघाडीने देशासमोर आणले आहे. पैसे वाटप करताना सापडलेले भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे अक्षरशः हातापाया पडत होते,मला जाऊ द्या,असे सांगत आक्रोश करत होते.नालायकपणा करण्याच्या साऱ्या मर्यादा भाजपवाल्यानी पार केल्या,त्यामुळे नियतीने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.नियती ही कोणालाही सोडत नाही,ती फक्त वेळ येण्याची वाट पाहत असते. केंद्रीय स्तरावर काम करणारे विनोद तावडे यांचा बिहार…
दीपक मोहिते, शुद्ध नालायकपणा… सारं काही संपल्यात जमा..भाजप नेते विनोद तावडे तावडीत सापडले, निवडणुकीची आचारसंहिता पूर्व व ती लागू झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पैश्याचा ओघ सुरू झाला आहे. हा पैसा कोण व कशासाठी पाठवण्यात हे आता लपून राहिलेले नाही.गेल्या महिन्याभरात राज्यात सुमारे एक हजार कोटीहून अधिक रकमा जप्त करण्यात आल्या आहेत.पालघर जिल्ह्यात तर गेल्या काही दिवसात २५ कोटी रु.पकडण्यात आले.हा सारा पैसा शेजारच्या गुजराथ व केंद्रशासित प्रदेशातून येत असतो. आज विरार पूर्व भागात नव्याने सुरू झालेल्या विवांता हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या भाजपचे लोक पैसावाटप करत असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हॉटेलवर हल्लाबोल करत भाजपच्या लोकांना रंगेहाथ पकडले.आश्चर्याची बाब…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भारतीय समाज सहिष्णू आहे,येथे ” व्होट जिहाद व बटेंगे तो कटेंगे,” या समाज विघातक धोषणाना येथे थारा मिळत नाही, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विविध हातखंडे वापरण्याचा प्रयत्न केला,पण ते आपल्यावरच उलटतील,हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते थांबवले.चला बघुया,त्यांनी कोणते मुद्दे प्रचाराच्या बाजारात आणण्याचा प्रयत्न केला व त्यांना माघार घ्यावी लागली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुपीक डोक्यातून ” व्होट जिहाद व बटेंगे तो कटेंगे,” हे दोन मुद्दे बाहेर आले व राज्यात सत्तेसाठी हपापलेले भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या मुद्द्यावर प्रचारास सुरुवात केली.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या लक्षात आले कि हे दोन्ही…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” विधानसभा निवडणुका ; महविकास आघाडी बाजी मारण्याची शक्यता, निवडणुकीत उभे असलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.मतदारराजा या निवडणुकीत आपला कौल कसा देतो ? याकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागले आहे.दैदिप्यमान इतिहास असलेले पुरोगामी राज्य व आर्थिक राजधानी असलेली मुंबई,आपल्या ताब्यात राहावी,यासाठी देव पाण्यात टाकून बसलेल्या केंद्रीय नेतृत्वाचे मनसुबे तडीस जातील का ? या प्रश्नाचे उत्तर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून मिळणार आहे. उद्या राज्यातील ९ कोटी मतदार एकूण २८८ लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतील.राज्यातील एकंदरीत राजकीय वातावरण लक्षात घेता या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.महायुती व महाविकास आघाडी,या दोघांनी या निवडणुकीत आपले सर्वस्व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपाच्या गुजराती नेत्याला ओरिजनल शिवसेना का संपवायची आहे ? ही सल आहे कुबेर नगरी हातातून निसटल्याची ही सल आहे,आंतराष्ट्रीय व्यापार-उद्योग असलेल्या शहरावरील कब्जा गेल्याची, ही सल आहे आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेचा ताबा नसल्याची.” १९६० ला जे जमलं नाही त्याचा “बदला” घेण्याची तयारी आता सुरू झाली आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत कधीही अखंड देश नव्हता. छोटी छोटी संस्थाने आणि थेट ब्रिटिश अंमलाखाली असलेले प्रांत मिळून स्वातंत्र्यानंतर आजचा ” भारत देश,” अस्तित्वात आला.भारताची मूळची प्रांतीय स्वायत्तता कायम ठेवण्याचे वचन घटनेने लोकांना दिले होते.प्रांतांची निर्मिती कशी करावी,यावर खूप चर्चा झाली.अखेरीस पंतप्रधान नेहरुंनी भाषावार प्रांत रचना करण्यास मान्यता दिली.त्यानुसार देशातील सगळे…
दीपक मोहिते, ” रणसंग्राम,” कुडाळ विधानसभा ; आ.वैभव नाईक यांचे पारडे जड, कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक व निलेश राणे,या दोघांमध्ये होणारी लढत केवळ मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नसून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) विद्यमान आ.वैभव नाईक विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राणे पुत्र निलेश राणे या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मतदारसंघातील वातावरण लक्षात घेता वैभव नाईक यांचे पारडे जड आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला,” अशी या मतदारसंघाची ओळख आहे.मात्र शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे.हे जरी खरं असलं तरी स्थानिक जनतेवर नाईक यांचा चांगला प्रभाव…
नवीन पाटील, ” रणसंग्राम,” बोईसर विधानसभा बविआसाठी प्रतिष्ठेची,शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत होणार चुरशीची लढत बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत चुरशीची स्पर्धा होणार असून बोईसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.मतदारसंघ निर्मितीपासून बोईसर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा बहुजन विकास आघाडीने विजय मिळवला आहे.बहुजन विकास आघाडीतून दोन टर्म आमदारकी भूषवलेले माजी आ.विलास तरे शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर बहुजन विकास आघाडीकडून विद्यमान आ.राजेश पाटील पुन्हा रिंगणात आहेत तर डॉ. विश्वास वळवी शिवसेनेच्या ( उद्धव ठाकरे ) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटनेकडून नरेश धोडी आणि मनसेचे शैलेश भूतकडे निवडणुकीच्या रिंगणात…
प्रितेश पाटील, ” रणसंग्राम,” डहाणू विधानसभा ; निकोले व मेढा या दोघांमध्ये सरळ लढत, महाराष्ट्राचे शेवटचे टोक असणाऱ्या आदिवासी बहुल डहाणू अनु.जमाती विधानसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी,खरी लढत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्स.कम्यु. पक्षाचे विद्यमान आमदार कॉ.विनोद निकोले आणि महायुतीचे भाजपच उमेदवार विनोद मेढा यांच्यात होत आहे.जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार कल्पेश भावर,बहुजन विकास आघाडीचे सुरेश पाडवी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय वाडिया,बहुजन समाज पक्षाचे संतोष ठाकरे,अपक्ष उमेदवार वसंत भसरा,आणि मिना भड रिंगणात असले तरी खरी लढत निकोले व मेढा या दोघांमध्ये होईल,असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. डहाणू अ.ज.विधानसभा मतदारसंघात एकूण ३…
दीपक मोहिते, रणसंग्राम, आज संध्या.प्रचार थंडावणार,उमेदवारांची जीवाची घालमेल सुरू, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ च्या मतदानाला अवघे ४८ तास उरले आहेत.आज संध्या.५.०० वाजता या निवडणुकीचा प्रचार थंडावणार आहे.गेले १४ दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने या निवडणुकीच्या प्रचारात मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणे,चौक सभा,बाईक रॅली,पदयात्रा,यावर भर दिला.भाजप एकमेव पक्षाचा अपवाद वगळता इतर राजकीय पक्षांनी जाहीर सभा घेतल्या नाहीत.केंद्रीय मंत्री राजनाथसिंह काल येऊन गेले. आज प्रचार बंद होणार असला तरी छुपा प्रचार मात्र सुरूच राहणार आहे,तसेच आज व उद्या अशा दोन रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” हे नाट्य जोमात रंगण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या अनेक…
दीपक मोहिते, निवडणूक संग्राम, पालघर विधानसभा ; गावित – दुबळा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत, १३० पालघर विधानसभा मतदारसंघात चार प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत.अनु .जमातीसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात राजेंद्र गावित शिवसेना ( शिंदे गट ) व जयेंद्र दुबळा शिवसेना ( उबाठा ) या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पालघरवासियांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे.त्याचा फायदा त्यांच्या पक्षाच्या जयेंद्र दुबळा यांना होण्याची दाट शक्यता आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.पक्षात फूट पडल्यानंतर सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले.त्यामध्ये पालघर नगरपरिषद,पालघर पंचायत समिती,पालघर जिल्हा…
