अनिरुद्ध पाटील, विरार,
साहित्य चावडीवर उलगडला प्रभू येशूचा जीवनपट,
भारतासह संपूर्ण जगभरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.नाताळ सणाचे औचित्य साधून मंगलमुर्ती मंदिर वाय. के.नगर विरार पश्चिम येथे ” साहित्य चावडीवर प्रभू येशूचा जीवनपट,” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साहित्य चावडीचे ६४ वे पुष्प असलेल्या या कार्यक्रमाचे सरपंच कवी एमेल जोसेफ आल्मेडा यांनी आपल्या भाषणात,संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरीता प्रभू येशू यांनी बलिदान दिल,त्या प्रभू येशू यांच्या विषयीचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला.एमेल जोसेफ आल्मेडा यांनी नाताळ विषयी संपूर्ण माहिती सांगून हा सण कशाप्रकारे साजरा करण्यात येतो, याविषयी परिपूर्ण माहिती सांगितली.कोणताही जातीभेद व धर्मभेद न पाळता सर्व सण एकत्रित साजरे करावे,नाताळ हा एकात्मतेचा सण आहे,असे सांगून साहित्यावर आधारित विविध कार्यक्रम राबवत असलेल्या साहित्य चावडीचे कौतुक केले.ही एक चळवळ आहे, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी चावडीचे कार्यक्रम आयोजित करावे,असेही त्यांनी यावेळी आयोजकांना सुचवले.
माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अजीव पाटील यांच्या सहकार्याने दर महिन्याला भरणारी साहित्य चावडी नंदाखालला भरवली तर मीही त्यात सक्रिय होऊन जबाबदारी घेतो,असे मत सरपंच यांनी मांडले.चावडी एकाच ठिकाणी न भरवता तिला फिरती ठेवली पाहिजे. कारण चावडीसारख्या कार्यक्रमाची आज समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी नितांत गरज आहे,असेही ते म्हणाले.पिता,पुत्र आणि पवित्र आत्मा,ही एक शिकवण आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा,असे म्हणून कोणत्याही शुभ कार्याला आम्ही सुरुवात करत असतो.
भगवान येशूचा जीवनपट या विषयावर सरोज भिडे, समीर पराडकर,गोविंद घरत, सुचित्रा पितळे,मानसी शिकवण,तृप्ती भंडारे,स्वाती नाईक,अशा अनेक साहित्यिकांनी येशूंविषयी आपले विचार व्यक्त केले. काही पुस्तकातील उताराचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर तराळे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत केसरकर व दीपाली जाधव यांनी परिश्रम घेतले.

