दीपक मोहिते,
टिवरी ग्रामपंचायतीचा
बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव,
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम मशीनवर उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर वसईतील टिवरी ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेत आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.टिवरी ग्रामपंचायत ही पालघर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे, ज्यांनी इव्हीएमला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीवरी ग्रामपंचायतीची २० डिसें.रोजी झालेली ग्रामसभा हा ठराव मंजूर करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. या सभेचे अध्यक्षपद उपसरपंच नुतनकुमार भोईर यांनी भूषवले तर माजी उपसरपंच नंदकुमार चौधरी हे या ठरावाचे सूचक होते.ग्रामस्थांनी एकमताने इव्हीएम हटावचा नारा दिला आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान घेण्याचे ठरवले.या ऐतिहासिक ठरावाला गावचे पोलीस पाटील अजित भोईर यांनीही अनुमोदन दिले आहे.
पालघर जिल्ह्यात हा पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
टिवरी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय पालघर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा देईल,अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.हा ठराव पारित झाल्यानंतर जिल्हाभरात त्यावर चर्चा सुरू झाली असून इतर गावांनीही असा निर्णय घ्यावा,विचार सुरू झाला आहे.
ग्रामस्थांनी हा निर्णय म्हणजे लोकशाहीसाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे, असे म्हंटले आहे.पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी बॅलेट पेपरची मागण,हे नागरिकांच्या आत्मविश्वासाचे प्रतिक आहे,अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
ग्रामसभेतील निर्णयामुळे टिवरी ग्रामपंचायत फक्त वसई किंवा पालघर जिल्ह्यासाठीच नाही,तर संपूर्ण राज्यासाठी एक मार्गदर्शक ठरू शकते.

