दीपक मोहिते,
अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघातर्फे, ” पेन्शनर्स डे, ” साजरा,
अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघातर्फे साजरा होणारा ” पेन्शनर्स डे, ” कार्यक्रम काल भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक सभागृह, विरार येथे पार पडला.
या कार्यक्रमाला वसई -विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर व सामजिक कार्यकर्ते राजीव पाटील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दिवाकर लोवलेकर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पेन्शनरांच्या अडचणी व त्याबाबतचे मार्गदर्शन,तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार,गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देवुन गुणगौरव करण्यात आले.या कार्यक्रमात कै. यशवंत केशव पाटील स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समितीच्या एका सदस्याचा रु. २१०००/- रोख पारितोषिक मानधन व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जातो.यंदा हा पुरस्कार दिवाकर लोवलेकर यांना ट्रस्टचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी राजीवnपाटील यांच्या हस्ते देण्यात आला.ट्रस्टतर्फे हा पुरस्कार गेली चार वर्षे सातत्याने देण्यात येत आहे.या संस्थेत काम करणारे हे ८० वर्षापर्यंतचे रेल्वे निवृत्त कर्मचारी असून ते आपल्या इतर बांधवाना मदत करण्यासाठी त्यांच्या समस्या घेऊन या वयातही चर्चगेट येथे जात असतात.कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीना मदत करणे, किंवा पेन्शनर लोकांना मार्गदर्शन करण्याचे कामही हे सदस्य कोणताही मोबदला न घेता करत असतात,म्हणून हा पुरस्कार त्यांना दिला जातो. सभेस मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी राजीव पाटील यांनी या वयात वृद्धांनी आपली कशी काळजी घ्यावी,, सुखी व समाधानी जीवन कसे जगावे, याविषयी आपले विचार मांडले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

