- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” न्यूजलाइन,” सर्व्हे पोल हे एक थोतांड असून व “अशी ही बनवाबनवी,” चा प्रयोग असतो, निवडणुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थांचे गेल्या दोन दिवसापासून अक्षरशः पीक आले आहे.काही संस्था या राजकीय पक्षाकडून मलिदा घेऊन आपले अंदाज व्यक्त करत असतात.या संस्थांपैकी अनेक संस्था,विविध वृत्तसंस्थाशी संबंधित असतात व या सर्व संस्था संबंधित राजकीय पक्षांना अनुकूल ठरतील,असे अंदाज व्यक्त करतात,असा आजवरचा अनुभव आहे.त्याबदल्यात या संस्थांना काय मिळते ? असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो.त्यांच्या या अंदाजाला काडीचाही आधार नसतो,पण मतदारांच्या मनात गोंधळ उडवून देणे,असा उद्देश असतो.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या संस्थानी सर्व्हे पोल जाहीर केले,ते तद्दन खोटे ठरले.त्यामुळे अशा…
दीपक मोहिते, ” निवडणूक विश्लेषण,” वाढीव मतांचा फायदा नक्की कोणाला ? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीची मतमोजणी अवघ्या ३६ तासावर येऊन ठेपली आहे.या निवडणुकीच्या मतदानात लक्षणीय वाढ झाली असून वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार ? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.पालघर जिल्ह्यात यंदा ६५.९५ % मतदान झाले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ % मतदान झाले होते.यंदा त्यामध्ये ४.९१ % ने वाढ झाली आहे.हे वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात जाईल,यावर राजकीय पक्षात चढाओढ आहे. २००९ पासून सलग झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा जागांपैकी सर्वाधिक जागा ( ३ ) जागा बहुजन विकास आघाडी जिंकत आली.तर १२९ विक्रमगड विधानसभा एकत्रित राष्ट्रवादी…
दीपक मोहिते, ” राज – का – रण,” ” आग लागल्याशिवाय धूर बाहेर पडत नाही,” भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसेवाटप करण्याच्या प्रकरणात भरारी अडकवण्यासाठी कट कारस्थान करणाऱ्या अज्ञात शक्ती कोण आहेत,याचा शोध घेण्यात यावा,अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आहे.त्यामुळे हे प्रकरण त्यांच्याच नेत्यांनी घडवून आणल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.अशात आ.हितेंद्र ठाकूर यांनी मला अनेक फोन आले की विनोद तावडे ५ कोटी रु.घेवून विरार येथे येत आहेत. त्यामुळे पाळत ठेवून त्यांना आम्ही रंगेहाथ पकडले,असे माध्यमांना सांगितले.त्यामुळे सगळ्याच्या भुवया वर गेल्या आहेत.या सर्व घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे,हे…
दीपक मोहिते, महाराष्ट्राची दशा आणि दिशा, काही किरकोळ अपवाद वगळता जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी, काल झालेल्या मतदानात टक्केवारी घसरल्यामुळे या निवडणुकीचा निकाल कसा लागेल,याविषयी सारे राजकीय पक्ष धास्तावले आहेत.त्यामुळे २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.सर्व्हे करणाऱ्या काही संस्थानी महायुती पुन्हा सत्तेत येईल,अशी शक्यता व्यक्त केली आहे,पण त्यामध्ये तथ्य नाही. मुंबई सारख्या शहरात मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे येथे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे गट व भाजप उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला.येथे भाजपचे संजय केळकर हे डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसून आले आहे.या मतदारसंघात शिवसेनेचे ( उबाठा ) राजन विचारे,बाजी मारण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे गटाचे प्रताप…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात एकुण ६५.९५ % मतदान, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार,कुठेही अनुचित घटना नाही, पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या ६ मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून एकूण ६५.९५ % इतके मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली. काल सकाळी ७.०० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली.संध्याकाळी मतदानाची वेळसंपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदान काळात कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व मतदारसंघात मतदान सुरळीतपणे पार पडले. सकाळी मतदानाच्या सुरुवातीस जवळपास सर्व मतदान केंद्रांवर तुरळक मतदार पाहायला मिळाले.दुपारी १.०० नंतर मतदारांच्या रांगा लागल्या व मतदानाला चांगलाच वेग आला. पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानिहाय अंदाजे मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…
दीपक मोहिते, दु.३.०० वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यात ४६.८२ % मतदान, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ३.०० वाजेपर्यंत सरासरी ४६.८२ % मतदान झाले होते.आज अनेक मतदानकेंद्रातील ईव्हीएम मशीन संथगतीने काम करत होत्या,त्यामुळे मतदार रांगेत ताटकळत उभे होते.खूप विलंब झाल्यामुळे अनेक मतदार कंटाळून निघून गेले.त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली.दुपारी ३.०० वाजेपर्यंत १२८ डहाणू – ५३.०२ %,१२९ विक्रमगड – ४९.६ %, १३० पालघर – ४७.६३ %, १३१ बोईसर – ४७.३६ %, १३२ नालासोपारा – ४०.९६ % व १३३ वसई – ४७.६४ % मतदानाची नोंद झाली.सर्वाधिक मतदान हे १२८ डहाणू ( ५३.०२ % ) येथे झाले.तर सर्वात कमी मतदान १३२ नालासोपारा मतदारसंघात ( ४०.९६ %…
दीपक मोहिते, विनोद तावडे यांचे वागणे,” सौ चुहे खाकर,बिल्ली चली हजको,” अशीच… काल झालेल्या घटनेच्या वेळी आ.हितेंद्र ठाकूर यांनी माणुसकी व संयम दाखवला नसतात,तर नको ती घटना घडली असती.भाजपचा नेता आपल्या मुलाविरोधात कटकारस्थान करतोय,हे माहित असूनही आ.ठाकूर यांनी संयम राखत त्यांना आपल्या कारमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले.आ.ठाकूर यांनी माणुसकी व संयम दाखवला नसता तर भाजपच्या त्या नेत्याला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर पडू दिले नसते.आ.ठाकूर हे आपल्या मैत्रीला जागले,पण विनोद तावडे यांनी मुंबई येथे पोहोचल्यानंतर ” सरडा जसा रंग बदलतो,” तसा आपला रंग बदलला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी आ.ठाकूर धादांत खोटे बोलत आहेत,असा आरोप केला व हॉटेलमधील सीसीटीव्हीचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची निती ; ” मी नाही त्यातली,कडी लावा आतली,” काल विरार येथे जे काही घडलं,त्याचे कदापी समर्थन होऊ शकणार नाही.लाखो रु.चे वाटप व लाभार्थ्यांच्या नावे असलेली डायरी ताब्यात घेतल्यानंतरही भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस,सुधीर मुनगंटीवार व वाचाळवीर प्रवक्ते प्रवीण दरेकर निर्लज्जपणे त्याचा इंकार करत सुटले आहेत.” खोटे बोल,पण रेटून बोल,” याचा आधार घेत ही नतद्रष्ट मंडळी आता माध्यमांसमोर थयथयाट करत आहेत.घटना घडली तेंव्हा विनोद तावडे हे प्रचंड तणावाखाली आले होते.हातापाया पडत होते,मला कृपया जाऊ द्या,अशी विनवणी करताना चॅनेलवर पहायला मिळाले.आता ते विनोद तावडे देखील ” मी नाही त्यातली,कडी लावा आतली,” अशा पद्धतीने वागत आहेत.तावडे आता म्हणत आहेत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आजच्या घटनेने भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर निकालाच्या दिवशी तोंड लपवण्याची पाळी येणार, नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी नको तो प्रकार करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.विरार येथे आज जे काही महाभारत घडले,ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ व सुशिक्षित नागरिकांच्या मनाला पटले नाही.त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे.ही घटना म्हणजे राजन नाईक यांच्यासाठी ” आ बैल मुझे मार,” असाच होता. वसई व नालासोपारा मतदारसंघात गेली ३५ वर्षे आ.हितेंद्र ठाकूर यांची निर्विवाद सत्ता आहे.२००९ सालचा अपवाद वगळता या उपप्रदेशावर ठाकूर कुटुंबीयांचे कायम वर्चस्व राहिले.शिवसेना,भाजप त्यापूर्वी जनता दल या साऱ्या पक्षांनी ठाकुरांचा पराभव…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विनोद तावडे यांना अवदसा आठवली,कार्यकर्त्यांच्या अक्षरशः हातापाया पडावे लागले, बेगडी हिंदुत्वाचा मुखवटा लावून फिरणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या काळाकुट्ट चेहऱ्यावरचा मुखवटा विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी टराटरा फाडला.भाजपच्या नेत्यांनी निदान आता तरी साधनशुचितेच्या गोष्टी करणे,सोडून द्यावे.भाजप निवडणुका कसे जिंकते ? हे बहुजन विकास आघाडीने देशासमोर आणले आहे. पैसे वाटप करताना सापडलेले भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे अक्षरशः हातापाया पडत होते,मला जाऊ द्या,असे सांगत आक्रोश करत होते.नालायकपणा करण्याच्या साऱ्या मर्यादा भाजपवाल्यानी पार केल्या,त्यामुळे नियतीने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.नियती ही कोणालाही सोडत नाही,ती फक्त वेळ येण्याची वाट पाहत असते. केंद्रीय स्तरावर काम करणारे विनोद तावडे यांचा बिहार…
