दीपक मोहिते,
दु.३.०० वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यात ४६.८२ % मतदान,
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ३.०० वाजेपर्यंत सरासरी ४६.८२ % मतदान झाले होते.आज अनेक मतदानकेंद्रातील ईव्हीएम मशीन संथगतीने काम करत होत्या,त्यामुळे मतदार रांगेत ताटकळत उभे होते.खूप विलंब झाल्यामुळे अनेक मतदार कंटाळून निघून गेले.त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली.दुपारी ३.०० वाजेपर्यंत १२८ डहाणू – ५३.०२ %,१२९ विक्रमगड – ४९.६ %, १३० पालघर – ४७.६३ %, १३१ बोईसर – ४७.३६ %, १३२ नालासोपारा – ४०.९६ % व १३३ वसई – ४७.६४ % मतदानाची नोंद झाली.सर्वाधिक मतदान हे १२८ डहाणू ( ५३.०२ % ) येथे झाले.तर सर्वात कमी मतदान १३२ नालासोपारा मतदारसंघात ( ४०.९६ % ) झाले.दुपारी ३.०० नंतर मतदानाला वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कमी मतदान झाले की त्याचा फायदा विद्यमान आमदाराना होत असतो,असा आजवरचा अनुभव आहे.येत्या चार तासात मतदानाला वेग येण्याची शक्यता आहे.दुपारी तीन नंतर मतदानकेंद्राच्या बाहेर प्रचंड रांगा लागतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
१२८ डहाणू येथे मार्क्स.कम्यू.पक्षाचे कॉ.विनोद निकोले व भाजपचे विनोद मेढा,१२९ विक्रमगड – राष्ट्रवादी पवार गटाचे सुनील भुसा व भाजपचे हरिश्चंद्र भोये व्यतिरिक्त जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम हे रिंगणात आहेत,त्यांना जिजाऊ संघटनेने पाठिंबा दिला आहे.
१३० पालघर येथे शिंदे गटाचे राजेंद्र गावित व ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा,यांनी एकमेकांना आव्हान दिले आहे.
१३१ बोईसरमध्ये विद्यमान आ.राजेश पाटील यांच्यासमोर शिंदे गटाचे विलास तरे व
उबाठा गटाचे डॉ.विश्वास वळवी या दोघांनी आव्हान उभे केले आहे.१३२ नालासोपारा येथे विद्यमान आ.क्षितिज ठाकूर चौथ्यांदा आपले नशीब अजमावत आहेत.त्यांच्यासमोर भाजपचे राजन नाईक व काँग्रेसचे संदीप पांडे उभे आहेत.
१३३ वसईमध्ये आ.हितेंद्र ठाकूर हे सातव्यांदा रिंगणात असून त्यांच्यासमोर काँग्रेसचे विजय पाटील व भाजपच्या स्नेहा दुबे आपले नशीब अजमावत आहेत.

