दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आजच्या घटनेने भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर निकालाच्या दिवशी तोंड लपवण्याची पाळी येणार,
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी नको तो प्रकार करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.विरार येथे आज जे काही महाभारत घडले,ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ व सुशिक्षित नागरिकांच्या मनाला पटले नाही.त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे.ही घटना म्हणजे राजन नाईक यांच्यासाठी ” आ बैल मुझे मार,” असाच होता.
वसई व नालासोपारा मतदारसंघात गेली ३५ वर्षे आ.हितेंद्र ठाकूर यांची निर्विवाद सत्ता आहे.२००९ सालचा अपवाद वगळता या उपप्रदेशावर ठाकूर कुटुंबीयांचे कायम वर्चस्व राहिले.शिवसेना,भाजप त्यापूर्वी जनता दल या साऱ्या पक्षांनी ठाकुरांचा पराभव करण्यासाठी कंबरतोड मेहनत केली,त्यांची कंबर तुटली पण त्यांचे इप्सित कधीही साध्य होऊ शकले नाही.कायम विरोध करणारे नेतेदेखील काळाच्या ओघात नाहीसे झाले.विनोद तावडे व उमेदवार राजन नाईक या दोघांनी केलेला हा घाणेरडा व माणुसकीला काळे फासणारा व येथील सर्व भाषिक मतदारांना कधीच पटणारा नाही,त्यामुळे हे मतदार उद्या होणाऱ्या मतदानाच्या वेळी चवताळून उठतील व २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालाच्या दिवशी राजन नाईक यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी येणार,एवढे मात्र नक्की….

