दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
विनोद तावडे यांना अवदसा आठवली,कार्यकर्त्यांच्या अक्षरशः हातापाया पडावे लागले,
बेगडी हिंदुत्वाचा मुखवटा लावून फिरणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या काळाकुट्ट चेहऱ्यावरचा मुखवटा विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी टराटरा फाडला.भाजपच्या नेत्यांनी निदान आता तरी साधनशुचितेच्या गोष्टी करणे,सोडून द्यावे.भाजप निवडणुका कसे जिंकते ? हे बहुजन विकास आघाडीने देशासमोर आणले आहे.
पैसे वाटप करताना सापडलेले भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे अक्षरशः हातापाया पडत होते,मला जाऊ द्या,असे सांगत आक्रोश करत होते.नालायकपणा करण्याच्या साऱ्या मर्यादा भाजपवाल्यानी पार केल्या,त्यामुळे नियतीने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.नियती ही कोणालाही सोडत नाही,ती फक्त वेळ येण्याची वाट पाहत असते.
केंद्रीय स्तरावर काम करणारे विनोद तावडे यांचा बिहार व अन्य राज्यात भाजपला सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा होता.त्यामुळे ते काहीसे हवेत वावरत होते.त्या राज्यात आपण जे काही करू शकलो,ते महाराष्ट्रातही करू शकतो,अशा गुर्मीत ते सध्या वावरत होते.त्यांना अवदसा आठवली व ते बिहार पॅटर्नच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तोच पॅटर्न वापरू,म्हणून ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आले.पण येथे त्यांची गाठ आ.हितेंद्र ठाकूर यांच्या कडव्या व कार्यकर्त्यांशी होती.त्यांना आ.हितेंद्र ठाकूर व त्यांच्या फौजेच्या ताकदीची कल्पना असूनही त्यांना अशी अवदसा का आठवावी,हे समजायला मार्ग नाही.आणि हे विरार येथील विवांता हॉटेलमध्ये अंधार असलेल्या भागात हे तावडे कार्यकर्त्यांच्या तावडीत आयते सापडले.राष्ट्रीय पातळीवरचा हा नेता अत्यंत बावरलेल्या परिस्थितीत अक्षरशः हातापाया पडत होता,मला जाऊ द्या हो,असा टाहो फोडत होता.यावेळी त्यांनी आ.हितेंद्र ठाकूर यांना किमान २५ फोन केले.पण लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांच्याकडे ” चुकीला माफी नाही आणि ती कदापि नाही,”
त्यामुळे तावडे यांच्या जीवाची घालमेल झाली व ती घालमेल उभ्या महाराष्ट्राने विविध वृत्तवाहिनीच्या चॅनेलवर पाहिली.वास्तविक विनोद तावडे व आ.हितेंद्र ठाकूर हे जिगरी दोस्त,पण विनोद तावडे यांनी आपल्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला.ही बाब नियतीला देखील पटली नाही,म्हणून नियतीने विनोद तावडे यांच्यावर सुड उगवला.या घटनेनंतर भाजपची लक्तरे वेशीला टांगली गेली,त्यातून बोध घेऊन निदान आता तरी आम्ही सकारात्मक राजकारण करतो,अशी जी पोपटपंची भाजप करत असते,ती त्यांनी बंद करावी.आता वसई व नालासोपारा मतदारसंघातील मतदारांनी या नादान पक्षाचा सूड उगवण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे,हे मी एक पत्रकार व मित्र या नात्याने तुम्हाला आवाहन करतो.ही किड येथून हद्दपार करण्यासाठी जागृत रहा.

