दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात एकुण ६५.९५ % मतदान,
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार,कुठेही अनुचित घटना नाही,
पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या ६ मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून एकूण ६५.९५ % इतके मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.
काल सकाळी ७.०० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली.संध्याकाळी मतदानाची वेळसंपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदान काळात कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व मतदारसंघात मतदान सुरळीतपणे पार पडले. सकाळी मतदानाच्या सुरुवातीस जवळपास सर्व मतदान केंद्रांवर तुरळक मतदार पाहायला मिळाले.दुपारी १.०० नंतर मतदारांच्या रांगा लागल्या व मतदानाला चांगलाच वेग आला.
पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानिहाय अंदाजे मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
१२८-डहाणू : ७२.५ %
१२९-विक्रमगड : ७७.७५ %
१३०-पालघर : ७१.०५ %
१३१ -बोईसर : ६६.१७ %
१३२-नालासोपारा : ५७.१ %
१३३-वसई : ६०.४६ %

