दीपक मोहिते,
” राज – का – रण,”
” आग लागल्याशिवाय धूर बाहेर पडत नाही,”
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसेवाटप करण्याच्या प्रकरणात भरारी अडकवण्यासाठी कट कारस्थान करणाऱ्या अज्ञात शक्ती कोण आहेत,याचा शोध घेण्यात यावा,अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आहे.त्यामुळे हे प्रकरण त्यांच्याच नेत्यांनी घडवून आणल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.अशात आ.हितेंद्र ठाकूर यांनी मला अनेक फोन आले की विनोद तावडे ५ कोटी रु.घेवून विरार येथे येत आहेत.
त्यामुळे पाळत ठेवून त्यांना आम्ही रंगेहाथ पकडले,असे माध्यमांना सांगितले.त्यामुळे सगळ्याच्या भुवया वर गेल्या आहेत.या सर्व घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे,हे दोघे ही शक्यता नाकारत असले तरी कुठे तरी धूर निघत आहे.एकनाथ खडसे,पंकजा मुंडे व स्वतः विनोद तावडे हे तिघे २०१४ साली मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते,पण त्यांच्या या महत्वाकांक्षी इच्छेमुळे त्यांच्या नशिबी राजकीय वनवास आला.कालांतराने विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी देण्यात आली.पंकजा मुंडे यांना आपल्या पुनर्वसनासाठी तब्बल सहा वर्षे प्रतिक्षा करावी लागली.तर एकनाथ खडसेंना पक्षत्याग करावा लागला.दरम्यान विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून वर्णी लागली व त्यांनी बिहार व अन्य राज्यात भाजपला सत्तेत आणण्याची किमया करून दाखवली.या निवडणुकीत त्याच्याकडे महाराष्ट्राचीही जबाबदारी सोपवण्यात आली.त्यामुळे भाजपमधील एक गट सध्या धास्तावला आहे.तावडे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्यास आपलं काही खरं नाही,या भावनेतून तावडे यांना विरार पैसेवाटप प्रकरणात अज्ञात शक्तीने व्यवस्थितपणे नियोजन करून अडकवले.त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस,सुधीर मुनगुंटीवार व दस्तुरखुद्द विनोद तावडे ही शक्यता धुडकावून लावत असले तरी कुठे तरी आग लागल्याशिवाय धूर बाहेर पडलेला नाही.

