दीपक मोहिते,
महाराष्ट्राची दशा आणि दिशा,
काही किरकोळ अपवाद वगळता जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी,
काल झालेल्या मतदानात टक्केवारी घसरल्यामुळे या निवडणुकीचा निकाल कसा लागेल,याविषयी सारे राजकीय पक्ष धास्तावले आहेत.त्यामुळे २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.सर्व्हे करणाऱ्या काही संस्थानी महायुती पुन्हा सत्तेत येईल,अशी शक्यता व्यक्त केली आहे,पण त्यामध्ये तथ्य नाही.
मुंबई सारख्या शहरात मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे येथे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे गट व भाजप उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला.येथे भाजपचे संजय केळकर हे डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसून आले आहे.या मतदारसंघात शिवसेनेचे ( उबाठा ) राजन विचारे,बाजी मारण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे गटाचे प्रताप सरनाईक व भाजपचे नरेंद्र मेहता हे पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत.मुंब्रा विधानसभा मतदारसंघात. राष्ट्रवादीचे ( शरद पवार ) जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांची डाळ शिजणार नाही.पालघर येथे शिंदे गटाचे राजेंद्र गावित,विक्रमगड येथे राष्ट्रवादीचे ( शरद पवार ) सुनील भुसारा यांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडू शकते.मार्क्स,कम्यू.पक्षाचे कॉ.विनोद निकोले डहाणूचा किल्ला पुन्हा काबीज करू शकतात.वसई व नालासोपारा येथे आ.हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर या दोघांची अनुक्रमे सातव्यांदा व चौथ्यांदा जादू चालणार आहे.बोईसर येथे मात्र विद्यमान आ.राजेश पाटील यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झुंज द्यावी लागणार आहे.शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.या आव्हानाला आ.राजेश पाटील कसे सामोरे गेले,यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.मुरबाड,शहापूर,डोंबिवली येथे अनुक्रमे किसन कथोरे,दौलत दरोडा व रविंद्र चव्हाण,हे विजयी होतील,असा अंदाज आहे.

