Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” पर्यटन विशेष,” पर्यटकांचे विशेष आकर्षण ; निसर्गरम्य ” वांद्री धरण,” महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्यात अनेक भागातील हिरवाई आणि गर्द वनसंपदेने नटलेले डोंगर – दऱ्यामध्ये मनसोक्त भटकंती करण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये भटकंती करत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर पर्यटकांचे मन मोहुन घेत असते. महाराष्ट्रामध्ये अनेक धरणे देखील असून पावसाळ्यात या धरणांना भेट देणे,ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते.परंतु काही धरणे ही सिंचनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून महाराष्ट्राची शान आहेत.यापैकी एक पालघर जिल्ह्यातील वांद्री धरण …. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण आणि…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुख्यमंत्रीपदाचा तिढा काही सुटेना,माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता, महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही अद्याप मंत्रिमंडळ स्थापन करणे शक्य झाले नाही.आज विधानसभेची मुदत संपत आहे.पण या मंडळीचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा मात्र सुटता सुटत नाही.दिल्लीहून जोवर खलिता येत नाही,तोवर अनिश्चितता कायम राहणार आहे.महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाला निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हे आमच्यामुळेच मिळाले आहे,असे वाटू लागल्यामुळे हा तिढा सुटण्यास काही काळ जावा लागणार आहे. भाजपच्या दिल्लीश्वरांच्या मनात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षापूर्वी केलेली ” मी परत येईन,मी परत येईन,” ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याची इच्छा आहे.त्यामुळे फडणवीस यांच्या फंटर्सच्या फौजेतील चंद्रशेखर बावनकुळे,गिरीश महाजन व प्रवीण दरेकर हे कामाला…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक विश्लेषण,” भाग क्र.२, १३२ नालासोपारा विधानसभा, नालासोपारा विधानसभा ; अखेर धनशक्ती जिंकली… या मतदारसंघाच्या निवडणुकीचे सारे अंदाज खोटे ठरले.या मतदारसंघात भाजप आपले खाते उघडेल,असे कोणाला वाटले नव्हते,पण जादूची कांडी फिरावी,तशी कांडी फिरली व भाजपचे राजन नाईक अनपेक्षितरीत्या निवडून आले.त्यांना मिळालेली संधी पाहून या विभागात असलेल्या तमाम राजकीय विश्लेषकांचे डोळे पांढरे फटक पडले.अखेर धनशक्ती व इव्हीएम दोघांच्या युतीने ही करामत करून दाखवली.या विजयाला निर्भेळ व प्रामाणिकपणे विजय,असे म्हणता येणार नाही.असो,जे झाले ते झाले.पण ही खंत म्हणा किंवा सल म्हणा,ही नालासोपारावासियाना कायम सलत राहणार आहे. गेल्या दीड शतकात अनेक पराभव पचवणाऱ्या राजन नाईक यांना लागलेली ही एक प्रकारची…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण,( १३१ बोईसर विधानसभा ) भाग क्र.१, पक्षबांधणीकडे झालेले दुर्लक्ष,पराभवाला कारणीभूत, १३१ बोईसर,१३२ नालासोपारा व १३३ वसई,या तीन मतदारसंघाच्या निवडणुकीचे लागलेले निकाल,हे चक्रावून टाकणारे असेच होते.तसेच ते दस्तुरखुद्द मतदारांनाही विचार करायला लावणारे होते.कारण देशात सध्या ” पैसा फेको,तमाशा देखो,” हा ट्रेंड मोठ्या वेगाने अमलात आणण्यात येत आहे.या मतदारसंघातही याच ” ट्रेंड,” नवनिर्वाचित आ.विलास तरे यांच्या विजयाला हातभार लावणारा ठरला.पण तरे यांना मिळालेले मताधिक्य लक्षात घेता,बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील मरगळही त्यास कारणीभूत ठरली,असे म्हटल्यास ते वावगं ठरू नये. १३१ बोईसर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली,प्रमुख तीन उमेदवारासह अन्य काही अपक्ष उमेदवारही रिंगणात होते.पण खरी लढत विद्यमान आ.राजेश पाटील…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण, पाचही महसूल विभागात महायुतीची आश्चर्यकारक कामगिरी, राज्याच्या पाचही महसूल विभागातील निकालावर एक नजर टाकली असता,ज्या विभागात शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे,त्या प.महाराष्ट्र,कोकण – मुंबई व विदर्भ या तीन विभागात त्यांना जबरदस्त फटका बसल्याचे दिसून आले आहे.लोकसभा निवडणुकीत जे मतदार महाविकास आघाडीला डोक्यावर घेतात, तेच मतदार अवघ्या सहा महिन्यात त्याच महाविकास आघाडीला लोळवतात,हे मनाला न पटणारे आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विदर्भात दमदार कामगिरी बजावली,त्या महाविकास आघाडीला केवळ १३ जागा मिळतात,तर महायुती ४९ जागा जिंकते.मुंबईची तऱ्हा देखील तशीच आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ०५ तर महायुतीच्या पदरात उत्तर मुंबईची एकमेव जागा पडते.तर यानिवडणुकीत महाविकास आघाडीला…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण, भाग क्र.३, मनसे ; विश्वासार्हता पार रसातळाला गेली, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या निवडणुकीत अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या.त्यांच्या या वाताहतीला ते स्वतः जबाबदार आहेत.आपल्या घराशेजारी असलेल्या मतदारसंघात आपण आपल्या मुलाला निवडून आणू शकत नाही,ही खरे दुर्दैव आहे.त्यांच्या पक्षाकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही,इतर पक्षावर खालच्या भाषेत तोंडसुख घेणे,टिंगल टवाळ्या व नकला करणे,इ.गैरप्रकारामुळे मतदारांनी या निवडणुकीत त्यांना अक्षरश: झिडकारले.यातून ते धडा घेतील,अशी शक्यता फार कमी आहे.कारण दुसऱ्याला कमी लेखणे,हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे.तो स्वभाव ते कधीही बदलू शकत नाहीत.कारण त्यांना लोकांकडून मिळणाऱ्या टाळ्यांचे फार मोठे आकर्षण आहे. असो,या निवडणुकीत त्यांचे एकमेव आ.राजू पाटील यांचाही सुपडा साफ झाला.वारंवार…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक विश्लेषण,” भाग क्र.२, संघाचे निवडणुकीत सक्रिय होणे,भाजपच्या पथ्यावर.. या निवडणुकीत मोदी फॅक्टर,नसताना भाजपने एवढे मताधिक्य कसे मिळवले ? याप्रश्नावर नजर टाकली असता,संघ अदृश्यपणे मोलाची कामगिरी करत होता,हे आपल्या लक्षात येईल.त्यांच्या ब्रह्मास्त्रापुढे मराठा व ओबीसी फॅक्टर देखील निष्प्रभ ठरले.गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागात मराठा फॅक्टर प्रभावी ठरला होता.तो या निवडणुकीत पूर्णतः निष्प्रभ ठरला.ओबीसी फॅक्टर ही फारसा चलनात आला नाही.या दोन्ही समाजाचे ध्रुवीकरण करण्यात संघ यशस्वी ठरला.या निवडणुकीत संघाने महायुतीच्या नेत्यांना जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले.त्यांच्या या आदेशाचे महायुतीच्या नेत्यांनी तंतोतंत पालन केले व जरांगे पाटील यांचे खच्चीकरण झाले.पूर्वी अंतरवाली सराटी गावात पत्रकारांची तोबा गर्दी होत…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण, भाग क्र.१ आपला मतदार क्षणिक आर्थिक लाभात आनंद मानणारा… विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून सर्वसामान्य मतदार देखील चक्रावून गेले आहेत.हा जो निकाल लागला आहे,त्याला लाट म्हणता येणार नाही,तर त्सुनामीच म्हणावे लागेल.कारण या त्सुनामीने लोकशाही पद्धतीच्या राजकारणाचा पायाच मुळासकट उध्वस्त करून टाकला आहे.आजवर राज्याच्या इतिहासात अशाप्रकारचे राक्षसी बहुमत व विरोधकांचे शिरकाण कधीच पहायला मिळाले नाही.विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षात घेता,त्यांना साधे विरोधी पक्षनेतेपद मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. या वावटळीत अनेक जुने वृक्ष उन्मळून पडले.सत्ताधारी महायुतीने अशी कोणती जादू केली की मतदारांनी त्यांना भरभरून मते दिली.लाडक्या बहिणींना दरमहा १५००/- रु.देण्याची योजना फलदायी ठरली का ? २ कोटी लाभार्थी…

Read More

दीपक मोहिते, अत्यंत विस्मयजनक निकाल, २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले,या निकालाने उभ्या महाराष्ट्राला अक्षरशः धक्का बसला.असा एकतर्फी निकाल कसा काय लागू शकतो,यावर दिवसभर लोकांमध्ये चर्चा सुरू होती.या निकालामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असावे,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात,आ.बच्चू कडू,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,आ.वैभव नाईक,आ.रोहिणी खडसे व दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले. राज्य विधानसभेत महायुती – २२८,महाविकास आघाडीच – ५६ व इतर ०५ असे बलाबल निर्माण झाले आहे.मुंबईसह कोकण विदर्भ,प.महाराष्ट्र,उ.,महाराष्ट्र,मराठवाडा या सहाही महसूल विभागात महायुतीने या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.” लाडकी बहीण योजना,” महायुतीला फलदायी ठरली…

Read More

दीपक मोहिते, ” रणसंग्राम इतिश्री,” एक अभ्यासपूर्ण लेख,” राज्यातील प्रमुख लढती ; ” कौन बनेंगे,मुकद्दरके सिकंदर ? ” उद्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे,अनेक उमेदवारांच्या मनात घालमेल सुरू झाली आहे.निकालाची वेळ अवघ्या अठरा तासावर येऊन ठेपली आहे.अनेक उमेदवारांनी नवस केले आहेत,तर अनेक उमेदवार मंदिराच्या फेऱ्या मारत आहेत.अशावेळी या निवडणुकीत आघाडी व युतीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे वृत्त धडकल्यामुळे उमेदवार भितीच्या सावटाखाली आले आहेत.महाविकास आघाडीने आपल्या सर्व उमेदवारांना कर्नाटक राज्यात स्थलांतरित केले आहे.विधानसभा त्रिशंकू झाल्यास अपक्षांचा भाव तर वधारलेच पण खरेदी विक्रीचा घोडेबाजार देखील सुरू होईल.त्यामुळे महाविकास आघाडीने यावेळी धोका होऊ नये,यासाठी कडेकोट बंदोबस्त केला आहे. चला तर आपण राज्यातील प्रमुख लढतीवर…

Read More