दीपक मोहिते,
निवडणूक विश्लेषण,
पाचही महसूल विभागात महायुतीची आश्चर्यकारक कामगिरी,
राज्याच्या पाचही महसूल विभागातील निकालावर एक नजर टाकली असता,ज्या विभागात शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे,त्या प.महाराष्ट्र,कोकण – मुंबई व विदर्भ या तीन विभागात त्यांना जबरदस्त फटका बसल्याचे दिसून आले आहे.लोकसभा निवडणुकीत जे मतदार महाविकास आघाडीला डोक्यावर घेतात, तेच मतदार अवघ्या सहा महिन्यात त्याच महाविकास आघाडीला लोळवतात,हे मनाला न पटणारे आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विदर्भात दमदार कामगिरी बजावली,त्या महाविकास आघाडीला केवळ १३ जागा मिळतात,तर महायुती ४९ जागा जिंकते.मुंबईची तऱ्हा देखील तशीच आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ०५ तर महायुतीच्या पदरात उत्तर मुंबईची एकमेव जागा पडते.तर यानिवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ १२ तर महायुतीला २३ जागा मिळतात,हे देखील न सुटणारे कोडे आहे.प.महाराष्ट्र हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट ) पाठीराखा राहीला आहे.पण या निवडणुकीत महायुतीने या विभागात ४४ जागा जिंकत तो पूर्णपणे नेस्तनाबूत केला.येथे महाविकास आघाडीला केवळ ०६ जागा जिंकता आल्या.मराठवाडा विभाग हा एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा गड मानला जात असे,या गडातही महायुतीने तब्बल ४० जागा जिंकत आपला झेंडा रोवला आहे.येथे महाविकास आघाडीला केवळ ०६ जागा जिंकता आल्या.उत्तर महाराष्ट्र हा सुरुवातीपासून महायुतीसोबत आहे,याही वेळी येथील मतदारांनी त्यांना उत्तम साथ दिली.येथे तब्बल ४१ जागांवर महायुतीने विजय मिळवला,तर महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी ०३ जा जिंकल्या.
पाच विभागात महायुती व महाविकास आघाडीच्या कामगिरीवर एक दृष्टिक्षेप…
१ ) विदर्भ – ६२,
१) महायुती-४९
२) मविआ,-१३
३) इतर -००,
**************
२ ) कोकण- ३९,
१) महायुती,-३२,
२) मविआ,- ०४,
३) इतर-०३,
**************
३) मुंबई – ३६
१) महायुती,-२३,
२) मविआ -१२,
३) इतर -०१,
************
४ ) उत्तर महाराष्ट्र- ४७,
१) महायुती,- ४१,
२) मविआ -०३,
३ ) इतर -०३,
*************
५ ) प.महाराष्ट्र- ५८,
१) महायुती,- ४४,
२) मविआ -१०,
३ ) इतर -०४,
*************
५ ) मराठवाडा- ४६,
१) महायुती,-४०,
२) मविआ- ०६,
३) इतर-०,
*************

