दीपक मोहिते,
अत्यंत विस्मयजनक निकाल,
२० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले,या निकालाने उभ्या महाराष्ट्राला अक्षरशः धक्का बसला.असा एकतर्फी निकाल कसा काय लागू शकतो,यावर दिवसभर लोकांमध्ये चर्चा सुरू होती.या निकालामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असावे,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात,आ.बच्चू कडू,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,आ.वैभव नाईक,आ.रोहिणी खडसे व दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले.
राज्य विधानसभेत महायुती – २२८,महाविकास आघाडीच – ५६ व इतर ०५ असे बलाबल निर्माण झाले आहे.मुंबईसह कोकण विदर्भ,प.महाराष्ट्र,उ.,महाराष्ट्र,मराठवाडा या सहाही महसूल विभागात महायुतीने या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.” लाडकी बहीण योजना,” महायुतीला फलदायी ठरली आहे.महायुतीमध्ये भाजप – १३३,शिवसेना,( शिंदे गट ) – ५५ व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट,) – ४०,तर महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २९,शिवसेना ( उबाठा ) -१९ व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )- १७ व इतर अपक्ष – ०४,असे एकूण २८८ उमेदवार निवडून आले आहेत.सोमवारी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक आहे.

