Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, कला क्रीडा महोत्सव आयोजित फिटनेस रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, वसई तालुका कला व क्रीडा विकास मंडळ,यंगस्टर ट्रस्ट आणि वसई विरार महानगरपालिका आयोजित महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, ख्रिसमस सणाचे औचित्य साधून या फिटनेस रनचे आयोजन करण्यात आले होते. समाजात आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश देणारी, ” ख्रिसमस फिटनेस रन, ” आज नानभाट चर्च,विरार ते नरवीर चिमाजी अप्पा मैदान,वसई या मार्गावर दु.४.०० वाजता सुरु झाली.नाताळ निमित्ताने आयोजित या फिटनेस रनला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केलेले ज्यूड डिसोझा,सचिन कवळी,प्रणय राऊत,तसेच लडाख खारदुंगला पास येथे प्रतिकूल हवामान परिस्थितीत ७२ कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन रन पुर्ण करणारे स्वप्निल पाटील आणि जैसलमेर ते…

Read More

दीपक मोहिते, तुंगारेश्वर अभयारण्यात भ्रष्टाचाराचे जंगलराज… नरभक्षक पकडण्यासाठी जाळे लावणारे अधिकारीच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकत असल्यामुळे तुंगारेश्वर अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तुंगारेश्वर अभयारण्यातील भ्रष्टाचाराचा अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मांडवी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला काल १० लाख रु.ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते.खाजगी इसमाच्या मदतीने वनजमिनीवरील बेकायदेशीर ताबा परत मिळवून देण्यासाठी ही लाच घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांवर एकामागून एक होणाऱ्या कारवायांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील भ्रष्टाचाराचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.काही महिन्यांपूर्वी गोखिवरे वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यालाही लाचलुचपत विभागाने…

Read More

जव्हार प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न, प्रबोधन आणि सामाजिक गरजा ओळखून त्वरित उपाययोजना या विषयावर आयोजित डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर वाळवांडा गाव, जव्हार या ठिकाणी १५ ते २१ डिसें.या दरम्यान संपन्न झाले. सोलार लाईट सर्वे,धूरविरहित चुली,जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिकवणे, युवकांसाठी मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण, डिजिटल जनजागृती, अनेमिया आजार संदर्भात जनजागृती,आर्थिक फवणूक संदर्भात जनजागृती,शालेय जीवनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा अशा विविध विषयावर कार्यक्रम आयोजीत केले गेले. या सोबतच विद्यार्थ्याना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.प्रो.तय्यब अली यांनी आर्थिक जनजागृती,डॉ रॉयल डिसोजा यांनी समस्या निवारण,डॉ.अविनाश अडसूळ यांचे जैव विविधता, विशाल शेंडे यांनी वारली…

Read More

दीपक मोहिते, अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघातर्फे, ” पेन्शनर्स डे, ” साजरा, अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघातर्फे साजरा होणारा ” पेन्शनर्स डे, ” कार्यक्रम काल भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक सभागृह, विरार येथे पार पडला. या कार्यक्रमाला वसई -विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर व सामजिक कार्यकर्ते राजीव पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दिवाकर लोवलेकर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पेन्शनरांच्या अडचणी व त्याबाबतचे मार्गदर्शन,तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार,गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देवुन गुणगौरव करण्यात आले.या कार्यक्रमात कै. यशवंत केशव पाटील स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समितीच्या एका सदस्याचा रु. २१०००/- रोख पारितोषिक…

Read More

अनिरुद्ध पाटील, विरार, साहित्य चावडीवर उलगडला प्रभू येशूचा जीवनपट, भारतासह संपूर्ण जगभरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.नाताळ सणाचे औचित्य साधून मंगलमुर्ती मंदिर वाय. के.नगर विरार पश्चिम येथे ” साहित्य चावडीवर प्रभू येशूचा जीवनपट,” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साहित्य चावडीचे ६४ वे पुष्प असलेल्या या कार्यक्रमाचे सरपंच कवी एमेल जोसेफ आल्मेडा यांनी आपल्या भाषणात,संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरीता प्रभू येशू यांनी बलिदान दिल,त्या प्रभू येशू यांच्या विषयीचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला.एमेल जोसेफ आल्मेडा यांनी नाताळ विषयी संपूर्ण माहिती सांगून हा सण कशाप्रकारे साजरा करण्यात येतो, याविषयी परिपूर्ण माहिती सांगितली.कोणताही जातीभेद व धर्मभेद न पाळता सर्व सण एकत्रित…

Read More

दीपक मोहिते, टिवरी ग्रामपंचायतीचा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम मशीनवर उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर वसईतील टिवरी ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेत आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.टिवरी ग्रामपंचायत ही पालघर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे, ज्यांनी इव्हीएमला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. टीवरी ग्रामपंचायतीची २० डिसें.रोजी झालेली ग्रामसभा हा ठराव मंजूर करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. या सभेचे अध्यक्षपद उपसरपंच नुतनकुमार भोईर यांनी भूषवले तर माजी उपसरपंच नंदकुमार चौधरी हे या ठरावाचे सूचक होते.ग्रामस्थांनी एकमताने इव्हीएम हटावचा नारा दिला आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान घेण्याचे ठरवले.या ऐतिहासिक ठरावाला गावचे पोलीस पाटील अजित भोईर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अशा पाहणीतून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं, मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर काही कॅबिनेट मंत्री झाडून पुसून कामाला लागल्याचे चित्र विविध वृत्तवाहिनीवर पाहायला मिळाले.अनेक मंत्र्यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या विभागांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.ही पाहणी करताना मंत्रीमहोदय नजरेस आलेल्या गैरप्रकाराबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांना झापायला देखील विसरत नाहीत.चांगली गोष्ट आहे,कारण अधिकारीवर्गाला अनागोंदी कारभाराबद्दल फैलावर घेतलेच पाहिजे.पण त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं.अन्यथा मंत्र्यांची पाठ फिरली की पुन्हा ” ये रे माझ्या मागल्या,” तसं झाल्यास मंत्र्यांची ही कृती ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” असे होईल.त्यामुळे या मोहिमेतून काहीतरी चांगलं निर्माण होईल,व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होईल,अधिकारीवर्ग झाडून कामाला लागतील,अशी…

Read More

दीपक मोहिते, ” अजातशत्रू,” अटलबिहारी वाजपेयी ; सृजनशील मनाचा सुधारणावादी नेता, भाजपचे थोर नेते,विचारवंत व देशाचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज शंभरावी जयंती आहे.त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत तीनवेळा पंतप्रधानपद भूषवले.१९९६,१९९८ व १९९९,असे तीन वेळा ते पंतप्रधान झाले.प्रखर राष्ट्रवादी,पत्रकार,साहित्यिक व यशस्वी राजकारणी, अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली.खासदार म्हणून त्यांनी चाळीस वर्षे संसदेत त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. आजीवन अविवाहित राहून त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशभर प्रचार केला.१९९९ साली त्यांनी २४ राजकीय पक्षाची एकत्रित मोट बांधत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली.त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना ११ व १३ मे १९९८ दरम्यान पोखरण येथे पाच अणुस्फोट करून भारत अणुशक्ती…

Read More

दीपक मोहिते, ” राज्याची अधोगती,” संतोष देशमुख हत्या ; आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू पुसणाऱ्याना नियती सोडणार नाही, राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे बीड जिल्ह्याची ओळख,” गुन्हेगारीचा जिल्हा,” अशी झाली आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीची प्रकरणे एकामागोमाग बाहेर येत असूनही आपले मायबाप सरकार जागे व्हायला तयार नाही.त्यांच्याच पक्षाचे आ.सुरेश धस यांनी सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली आहेत.पण सरकार त्यातून काही बोध घ्यायला तयार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत,त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.त्यांनी ही मागणी करताना मुंडे यांचे वाल्मिक कराड यांचे एकमेकांशी कसे घनिष्ट संबंध आहेत,हे पुराव्यानिशी दाखवून दिले,पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत.फडणवीस हे दररोज…

Read More

जव्हार,प्रतिनिधी, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, महाराष्ट्र शासन राज्य पेसा कक्ष पुणे,ग्रामविकास व पंचायतराज विभाग,जिल्हा परिषद पालघर,पंचायत समिती जव्हार पेसा कक्ष आणि ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पेसा कायद्याच्या निर्मितीला २८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे आणि लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या हस्ते झाले.धरतीआबा भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उदघाटन सोहळा पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारचे सहा.गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर…

Read More