वसंत भोईर,वाडा,
आबिटघर येथे महिलांचा भव्य मेळावा,
माध्यमिक विद्यालय आबिटघर येथे महिलांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता.महिला आणि बालकल्याण समिती सभापती रोहीणी शेलार,सभापती पं.स.वाडा, अश्विनी लहांगे जि.प.सदस्या, भक्ती वलटे,उपसभापती जगदीश पाटील,पं.स.सदस्य शांताराम माळी,अमोल पाटील,सागर ठाकरे,अस्मिता बिर्जे ( बालविकास प्रकल्प अधिकारी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी विशेष रंगत आणली.कायदेविषयक मार्गदर्शन,बाळंत विडा किट वाटप,आरोग्य तपासणी, हळदीकुंकू समारंभ, स्त्रीभ्रूणहत्या व बालविवाहावर आधारित नाटिका,आहार प्रदर्शन,रांगोळी प्रदर्शन आणि पूर्व प्राथमिक शिक्षण स्टॉल यांचा समावेश होता.
यावेळी दिलीप माने (महिला समुपदेशक), गायकर (आस्था फाउंडेशन ), सपना पाटील, उत्कर्षा मॅडम ( लर्निंग स्पेस फाउंडेशन ) तसेच माध्यमिक विद्यालय आबिटघर येथील शिक्षकवृंद उपस्थित होते.
या मेळाव्याद्वारे महिलांच्या आरोग्य,शिक्षण व सामाजिक प्रश्नांवर जागरूकता निर्माण करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालविकास विभाग व स्थानिक संस्थांनी पुढाकार घेतला.उपस्थित महिलांनी आणि गावकऱ्यांनी कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

