संजय लांडगे,वाडा,
सरपंच अवनी सांबरे प्रजासत्ताक दिनी जाणार दिल्लीला,
वाडा तालुक्यातील हमरापुर ग्रामपंचायतच्या सरपंच अवनी सांबरे प्रजासत्ताक दिनी दिल्लीला जाणार आहेत. पालघर जिल्ह्यात हमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सांबरे यांना हा मान मिळाला आहे.नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच अवनी अजय सांबरे व त्यांचे पती अजय गजानन सांबरे सांबरे यांना आमंत्रित केले आहे.यासंदर्भात नुकतेच पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच यांना पत्र पाठवले आहे.
यावर्षी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडकरीता जिल्ह्यातून हमरापूर ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतीला प्रथमच मान मिळाला असून नवी दिल्ली येथे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित राहण्यासाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून ग्रामपंचायत सरपंचांची नावे त्यांच्या कुटुंबासह केंद्र शासनाने निवड करण्यात आली आहे.या संदर्भात डॉ.प्र.सु.गांगुर्डे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचे पत्र संबंधित विभागाला प्राप्त झाले आहे.वाडा तालुक्यातील महिला सरपंचाला प्रथमच हा बहुमत मिळाल्याने सरपंच संघटना तसेच गावकरी व पंचायत समिती सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हमरापूर ग्रामपंचायत स्तरावर शासनाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरावर विविध उपक्रम राबवून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.त्यामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते.त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. महिला सरपंच असून गावामध्ये विविध उपक्रम राबवत आहेत.माझी वसुंधरा अभियानात भाग घेऊन विविध उपक्रम सरपंच अवनी सांबरे यांच्या उपस्थितीत राबवले जात आहेत.या उपक्रमांची जिल्हास्तरावर दखल घेत सरपंच यांना दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

