वसंत भोईर,वाडा
कुडूस येथे श्रीराम सेवा संस्थेतर्फे कलश व भव्य शोभायात्रेचे आयोजन,
तालुक्यातील कुडूस येथे श्रीराम सेवा संस्थेतर्फे श्रीराम मंदीर स्थापना दिनाचे औचित्य साधून कलश व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रेत कुडूस व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यात महीला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
गेल्या वर्षी २२ जाने.२४ रोजी रोजी आयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.या दिनाचे औचित्य साधून ही शोभायात्रा काढण्यात आली असल्याचे श्रीराम सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनेश पांडेय यांनी सांगीतले.
या निमित्ताने श्रीराम संस्थेच्या वतीने कुडूस येथे २२ ते ३० जाने.संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत राम कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व रामभक्तांनी या कथेच्या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा.यासाठी श्रीराम संस्थेचे अध्यक्ष दिनेश पांडेय व कुडूस परिसरातील राम भक्त यांनी मुकुंद शेखावत कंपाऊंड,महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोर कुडूस येथे भव्य मंडपामध्ये या कथेचे आयोजन केले आहे.या रामकथेचे वाचन श्री क्षेत्र काशी येथील सुप्रसिद्ध कथावाचक शशिकांत महाराज व काशी येथील सुप्रसिद्ध कथा वाचक आराधना देवी हे करणार असल्याची माहीती श्रीराम सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनेश पांडेय यांनी दिली.

