Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा, प्रिंट मिडीयाचे महत्व भविष्यातही कायम असेल – प्रा. डॉ.किशोरी भगत आज डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे युग असले तरी प्रिंट मिडीया व वृत्तपत्राचे महत्व भविष्यातही कायम राहील,असे प्रतिपादन डॉ.शांतीलाल देवशी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.किशोरी भगत यांनी केले.डॉ.देवशी महाविद्यालय आणि वाडा तालुका पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील होते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कौशल्य शिकता येणार आहे.मुख्य पदवीसोबतच पत्रकारितेचेही शिक्षण घेता आले तर पत्रकारिता क्षेत्राचा करियर म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल. पत्रकारितेत असलेल्या उपस्थित पत्रकारांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी महाविद्यालयाने…

Read More

वसंत भोईर,वाडा, डाहे,मांगरुळ येथे महिला मेळाव्याचे आयोजन, डाहे व मांगरूळ ग्रामपंचायत मध्ये दोन वेगवेगळे महिला मेळावे आयोजित करण्यात आले होते.या मेळाव्यात लोकप्रतिनिधी व महिला कायदे विषयक जाणीव जागृती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग,वाडा तसेच जिल्हा महिला व बालकल्याण जिल्हा परिषद विभाग पालघर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.या महिला मेळाव्यासाठी ग्रामपंचायत डाहे सरपंच,ग्रामपंचायत मांगरुळ व सदस्य उपस्थितीत होते. या महिला मेळाव्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलींना विविध सांस्कृतिक गाणी व अंगभूत कला व गुणांचे कार्यक्रम सादर केले. अँड.रविंद्र पाटील यांनी महिला कायदेविषयक मार्गदर्शन केले.

Read More

दीपक मोहिते, परिवर्तनाची लढाई पुढे चालू ठेवा – राम नाईक, राम नाईक. वसईतील परिवर्तनाच्या लढाईची प्रक्रिया मताचा अधिकार वापरून सुरू झाली आहॆ.त्याची जबाबदारी नवनिर्वाचित आमदारांवर आहे,असे उदगार उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक यांनी सामवेदी ब्राह्मण समाजाने उमराळे येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात काढले. विरार – उमराळे येथे सामवेदी ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या,या कार्यक्रमात व्यासपीठावर खा.डॉ हेमंत सवरा,तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक,प्रल्हादाचार्य नागरहळी गुरुजी,बिशप थाॅमस डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते. राम नाईक आपल्या भाषणात पुढे म्हणाले,बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास संरक्षण मिळवून देवून आस्था जपणे,सर्वधर्मिय सलोखा टिकवणे,सर्व समाजांना समान न्याय,आगरी-कोळी,…

Read More

दीपक मोहिते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप,शिंदे गटाची गळचेपी  करणार, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप,आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी विविध आमिषे दाखवण्यात येत आहेत.मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली, कुळगाव-बदलापूर,भिवंडी-निजामपुर,उल्हासनगर व वसई-विरार शहर महानगरपालिका यावर त्यांचे विशेष लक्ष आहे.नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक यांच्या ताब्यात असल्यामुळे येथे त्यांना कोणतीही अडचण भासणार नाही.येथे सर्व अधिकार नाईक यांच्या कडे सोपवण्यात येणार आहेत.तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदा सध्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत.त्याही आता भाजप हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे.पालघर लोकसभा व वसई,नालासोपारा,पालघर,बोईसर व विक्रमगड या पाच विधानसभा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे भाजप,शिंदे गटाची या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More

नवीन पाटील,सफाळे, कुणबी समाज आयोजित क्रिकेट स्पर्धेत भादवे संघाचा दणदणीत विजय… पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक ( कुणबी ) समाजाच्या खटाळी गटातील सफाळे संघाच्या सहकार्याने काल कपासे येथील क्रीडा मैदानात मर्यादित षटकाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या अंतिम व अटीतटीच्या सामन्यात भादवे संघाने कपासे संघावर २७ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले.तर कपासे संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक ( कुणबी ) समाजाच्या खटाळी गटातील सफाळे संघाच्या माध्यमातून समाजाच्या विविध गटाच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.क्रिकेट प्रमुख ऋषी पाटील आणि सफाळे संघानी स्पर्धेसाठी विशेष आयोजन केले होते.यावेळी…

Read More

दीपक मोहिते, वास्तव, पत्रकार दिन ; ख़ुशी कम,ज्यादा गम, आज साजरा होत असलेल्या पत्रकार दिनावर सध्या मंदी,क्षेत्रातील गैरप्रकार व मोठ्याप्रमाणात असलेल्या भितीचे सावट इ.कारणामुळे हा दिवस आपल्याला अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागत आहे.कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या क्षेत्राची गेली अनेक दशके ओळख होती,तो स्तंभ आता इतिहासाजमा होत आहॆ. स्वातंत्र्यपूर्व काळात नावारूपाला आलेल्या ” आदर्श पत्रकारिते, ” चे ” गोदी मीडिया, ” असे नामकरण कधी झाले,ते कळले देखील नाही.असो,पण आज पत्रकारदिना निमित्त पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा… ” पत्रकारिता, ” ही एक समाजहितासाठी आवश्यक असलेली सेवा आहे,पण गेल्या काही वर्षात तीचे स्वरूप बदलत गेले व सेवेचे रूपांतर व्यवसायात होत गेले.त्यामुळे या सेवा…

Read More

राहुल इंटरनॅशनल स्कूलच्या युनिटी ब्लेज ई क्र्यूने उंचावले बोईसरचे नाव..! बोईसर, संदीप जाधव इन्फिनिटी मॉल,मालाड येथे झालेल्या १३ व्या इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत देशभरातील ६० नामांकित ग्रुप्सनी आपल्या अप्रतिम सादरीकरणाने नृत्यकलेचा उत्सव साजरा केला.या स्पर्धेत आसाम, गुजरात,मध्य प्रदेश,महाराष्ट्र, पंजाब,राज्यांतील विद्यार्थ्यांनी हिप हॉप नृत्याच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य सादर केले. या स्पर्धेत बोईसरच्या राहुल इंटरनॅशनल स्कूलच्या युनिटी ब्लेज ई क्र्यूने दिमाखदार कामगिरी करत जेव्ही मेगा क्र्यू कॅटेगरीत अकरावा क्रमांक पटकावला.ग्रुपमधील क्रिश कल्पेश पाटील,राही वैभव पाटील,स्वामिनी चौधरी,आद्या पुरी, दृष्टी सिंह,सांची धोडी, शरण्या देशमुख,रिशी सिंह, विकास कुशवाह,आर्चीत मेश्राम आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कोरिओग्राफर आदित्य तांबे…

Read More

नदीम शेख,पालघर, संविधान सन्मान समिती पालघरतर्फे ‘’ सावित्रीच्या लेकी, ” कार्यक्रमाचे आयोजन, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती पास्थळ ग्रामपंचायत हॉल,बोईसर येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.मयुरी शेवाळे,जनरल सर्जन लोकसेवा हॉस्पिटल, बोईसर यांचे हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री भोये, उपसरपंच ग्राम पंचायत पास्थळ,निताताई काटकर उपाध्यक्ष,भूमिसेना / आदिवासी एकता परिषद, पालघर,विद्या राजपूत,खान्देश मित्र मंडळ महिला प्रमुख बोईसर,निकिता रुपेश पाटील,अखिल भारतीय भंडारी समाज महिला संघ पालघर जिल्हा अध्यक्ष शितल चंद्रकांत मोरे, अधिपरिचारिका,पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय भाईंदर,सुनीता सिंग गावडे, सामाजिक कार्यकर्त्या,बोईसर इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंजू गोवारी,माजी सरपंच पास्थळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता…

Read More

वसंत भोईर,वाडा, वाड्यात ” भाजपा सदस्यता,” अभियानाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जगात क्रमांक १, चा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.वाड्यात युवा मोर्चाच्या वतीने दोन दिवसापूर्वी ” भाजपा सदस्यता,” अभियानास वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात प्रारंभ करण्यात आला.या अभियानास तालुक्यातील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या आपला भारत देश जगासोबत स्पर्धा करत आहे.तसेच विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे.देशाच्या विकासात युवा वर्गाचा हातभार लागला जात आहे.त्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने भाजपात सामील व्हावे,असे आवाहन जेष्ठ नेते बाबाजी काठोळे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना केले आहे. यावेळी विविध पक्षांतील तरुणांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. याप्रसंगी जेष्ठ नेते…

Read More

वसंत भोईर,वाडा, बळीराजाची लूट सुरूच: भराईला पोते नाहीत,साठवणुकीला जागा नाही, तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासीन कारभाराचे ग्रहण लागल्याने भात खरेदीचा पुरता भोजवारा उडाला आहॆ.त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे वाडा तालुक्यात परळी,मानिवली,गो-हे, गुहिर, पोशेरी,कोनसई,सारशी,खैरे -आंबिवली येथे भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.परंतु या केंद्रांवर भात भरण्यासाठी लागणारे पोतीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारून ही भात विक्री करता येत नाही.तसेच या केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन अपमानित करत असल्याच्या अनेक शेतकरी तक्रारी करत आहेत.केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भाताची प्रतवारी ठरविताना नुकसान सोसावे…

Read More