दीपक मोहिते,
परिवर्तनाची लढाई पुढे चालू ठेवा – राम नाईक,
राम नाईक. वसईतील परिवर्तनाच्या लढाईची प्रक्रिया मताचा अधिकार वापरून सुरू झाली आहॆ.त्याची जबाबदारी नवनिर्वाचित आमदारांवर आहे,असे उदगार उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक यांनी सामवेदी ब्राह्मण समाजाने उमराळे येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात काढले.
विरार – उमराळे येथे सामवेदी ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या,या कार्यक्रमात व्यासपीठावर खा.डॉ हेमंत सवरा,तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक,प्रल्हादाचार्य नागरहळी गुरुजी,बिशप थाॅमस डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते. राम नाईक आपल्या भाषणात पुढे म्हणाले,बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास संरक्षण मिळवून देवून आस्था जपणे,सर्वधर्मिय सलोखा टिकवणे,सर्व समाजांना समान न्याय,आगरी-कोळी, आदिवासी समाज बांधवांचे हित जपणे,तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे,यासाठी झटले पाहिजे.मी आता वानप्रस्थाश्रमाच्या स्थितीत पोहोचलो आहे,पण आपल्या पावलावर पाऊल टाकून आपला मुलगा कर्तृत्ववान झालेला पाहण्याचा आनंद खूप मोठा असतो.तीच अपेक्षा आ.राजन नाईक यांच्याकडून मला आहे.आदर्श आमदाराचा प्रवास सहज सोपा नसला तरी राजन नाईक तो सहज करतील,अशी अपेक्षा आहॆ. त्यांना माझ्या उदंड शुभेच्छा. खा.डॉ हेमंत सवरा यांनी आपल्या मनोगतात राजन नाईक,हे माझ्या मोठ्या भावासमान असल्याचे सांगून ते आमदार झाल्याचा मला खूप आनंद आहॆ.बबन शेठ नाईक यांनी आपल्या समाजाचे राजन नाईक प्रथम आमदार झाल्याचा आम्हाला आनंद तर आहे.सर्व समाज एकदिलाने त्याना सहकार्य करेल,अशी ग्वाही दिली.प्रल्हादाचार्या नागरहळी गुरूजी,बिशप थाॅमस डिसोजा व अनेक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची यावेळी समयोचीत भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत पाटील यांनी केले. सुत्रसंचलन सत्यवान पाटील तर आभार प्रदर्शन राजेश नाईक यांनी केले.

