वसंत भोईर,वाडा,
वाड्यात ” भाजपा सदस्यता,” अभियानाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
जगात क्रमांक १, चा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.वाड्यात युवा मोर्चाच्या वतीने दोन दिवसापूर्वी ” भाजपा सदस्यता,” अभियानास वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात प्रारंभ करण्यात आला.या अभियानास तालुक्यातील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्या आपला भारत देश जगासोबत स्पर्धा करत आहे.तसेच विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे.देशाच्या विकासात युवा वर्गाचा हातभार लागला जात आहे.त्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने भाजपात सामील व्हावे,असे आवाहन जेष्ठ नेते बाबाजी काठोळे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना केले आहे.
यावेळी विविध पक्षांतील तरुणांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी जेष्ठ नेते बाबाजी काठोळे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार,संदेश सवरा,गटनेते मनीष देहेरकर, तालुका सरचिटणीस रोहन पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितिन घरत, कुणाल साळवी,मिलींद वाडेकर,अशिष पवार,प्रसाद सोनटक्के,कल्पेश चौधरी,कल्पेश पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

