नदीम शेख,पालघर,
संविधान सन्मान समिती पालघरतर्फे
‘’ सावित्रीच्या लेकी, ” कार्यक्रमाचे आयोजन,
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती पास्थळ ग्रामपंचायत हॉल,बोईसर येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.मयुरी शेवाळे,जनरल सर्जन लोकसेवा हॉस्पिटल, बोईसर यांचे हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री भोये, उपसरपंच ग्राम पंचायत पास्थळ,निताताई काटकर उपाध्यक्ष,भूमिसेना / आदिवासी एकता परिषद, पालघर,विद्या राजपूत,खान्देश मित्र मंडळ महिला प्रमुख बोईसर,निकिता रुपेश पाटील,अखिल भारतीय भंडारी समाज महिला संघ पालघर जिल्हा अध्यक्ष शितल चंद्रकांत मोरे, अधिपरिचारिका,पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय भाईंदर,सुनीता सिंग गावडे, सामाजिक कार्यकर्त्या,बोईसर इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंजू गोवारी,माजी सरपंच पास्थळ यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता प्रा.डॉ.प्रियदर्शनी ढोले, सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य व त्यांची चळवळ समजावून सांगितली. महिलावर त्यांचे काय उपकार आहेत व महिलांनी काय केले पाहिजे,याविषयी जाणीव करून दिली.तसेच भारतीय संविधानाने महिलांना काय दिले हिंदू कोडबील,महिला आरक्षण,महिलांना संविधानिक अधिकार,काय आहेत,याविषयी प्रबोधन केले. सदर कार्यकमामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कल्पना बोरसे,रुबीना शेख,प्रिया मोरे,शुभेच्छा चिकणे यांनी खूप मेहनत घेतली.

