वसंत भोईर,वाडा,
डाहे,मांगरुळ येथे महिला मेळाव्याचे आयोजन,
डाहे व मांगरूळ ग्रामपंचायत मध्ये दोन वेगवेगळे महिला मेळावे आयोजित करण्यात आले होते.या मेळाव्यात लोकप्रतिनिधी व महिला कायदे विषयक जाणीव जागृती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग,वाडा तसेच जिल्हा महिला व बालकल्याण जिल्हा परिषद विभाग पालघर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.या महिला मेळाव्यासाठी ग्रामपंचायत डाहे सरपंच,ग्रामपंचायत मांगरुळ व सदस्य उपस्थितीत होते.
या महिला मेळाव्यात जिल्हा परिषद शाळेतील मुलींना विविध सांस्कृतिक गाणी व अंगभूत कला व गुणांचे कार्यक्रम सादर केले. अँड.रविंद्र पाटील यांनी महिला कायदेविषयक मार्गदर्शन केले.

