- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा, सरपंच हत्येच्या निषेधार्थ वाड्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद, बीड जिल्हातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी त्यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेने पुकारलेल्या बंदला वाडा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांशी ग्रामपंचायतींनी कामकाज बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला. वाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्व.संतोष देशमुख यांना श्रध्दांजली वाहून कार्यालय बंद ठेवून निषेध नोंदवला.सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.या आंदोलनात सरपंच, उपसरपंच,सदस्य कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.
दीपक मोहिते, महिला मेळावा व लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, आज एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पालघर अंतर्गत महिलांसाठी विशेष मेळावा व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वेढी हद्दीतील वीट भट्टीवर करण्यात आले.या कार्यक्रमात महिला व बालकल्याणाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या सरिता सुतार,पंचायत समिती सदस्या रेखा तरे, वेढी गावचे सरपंच नचिकेत पाटील,उपसरपंच अभिजीत पाटील,तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वीटभट्टी व गावातील सुमारे १०० महिला,बालके आणि किशोरी मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांनी केले.मुख्यसेविका सुरेखा सूरवसे यांनी…
दीपक मोहिते, हागणदारी मुक्त अधिक व स्वच्छतेची शाश्वतता टिकविण्यासाठी लोकचळवळ जिल्ह्यात कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे,नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे,त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना, कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये १ ते २० जाने. २०२५ या कालावधीत स्वच्छ माझे आंगण अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन,पालघर जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहॆ. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा – २ अंतर्गत स्वच्छतेची विविध कामे करण्यात येत आहेत. १ ते २० जाने.या कालावधीत या अभियानाची…
सुरेश काटे,तलासरी, तलासरी येथे ” रेझिंग डे, ” उपक्रम संपन्न, तलासरी पोलीस ठाणे येथे ” रेझिंग डे,”च्या निमित्ताने शेतकी शाळा तलासरी पाटीलपाडा येथील विद्यार्थ्यांसाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय मुतडक तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याना एस.एल.आर. रायफल,कार्बाइन,३ नॉट ३, टीयर गॅस गन,आदी अत्याधुनिक शस्त्रांची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ करावयाच्या उपायोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.पोलिसांच्या या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. नव्या पिढीला आपल्या संरक्षण व्यवस्थेतील महत्वाच्या साहित्य व उपकरणाची माहिती असायला हवी,असा हेतू हा उपक्रम राबवण्यामागे होता.
दीपक मोहिते, राज – का – रण ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ; राजकीय हालचालींना वेग, वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचाली व जुळवाजुळवीच्या कामांना सुरुवात झाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक बडा नेता नुकताच वसई – विरारच्या दौऱ्यावर येऊन गेला.या दौऱ्यात या नेत्याने एका बड्या नेत्याची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. गेली चार वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागले आहे.येत्या २२ जाने.रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होत आहे.या…
संजय परब,वसई, कनिष्ठ अभियंत्याला अखेर कामावरून कमी करण्यात आले, वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ” जी,” मध्ये कार्यरत असलेला कनिष्ठ अभियंता कौस्तुभ संजय तामोरे यांस डच्चू देण्यात आला आहे.बेजबाबदार व बेशिस्त वर्तणुकीमुळे ठेक्यातून त्याला कमी करण्यात यावे,असे आदेश अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी नुकतेच दिले. कौस्तुभ संजय तामोरे हा कनिष्ठ अभियंता या पदावर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अतिक्रमण-अनधिकृत बांधकाम विभागात कार्यरत होता.मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी वसई-विरार महापालिकेला प्राप्त झालेल्या होत्या. त्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्यामुळे त्याना ठेक्यातून तात्काळ कमी करण्याचे लेखी आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.त्यानुसार अर्चना सर्व्हिसेस,या ठेकेदार कंपनीने कनिष्ठ अभियंता कौस्तुभ संजय तामोरे यांना ठेक्यातून कमी केल्याचे…
नदीम शेख,पालघर संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती सभा संपन्न आज दि. ०८/०१/२०२५ रोजी जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित कण्यात आली होती. सदर सभेमध्ये HMPV या आजाराविषयी उपाययोजना व राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचना अंमलात आणण्यासाठी आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ.संतोष चौधरी सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.पालघर,डॉ.रामदास मराड जिल्हा शल्य चिकित्सक,शशिकांत साळुंके जिल्हा सर्वेक्षण अधिकारी,डॉ. संदिप निंबाळकर, सहा-संचालक कुष्ठरोग,डॉ. अजय ठाकरे साथरोग अधिकारी,डॉ.अश्विनी राव जिल्हा हिवताप अधिकारी इ. तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख / प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी…
नवीन पाटील,सफाळे, पाणीटंचाईवर तातडीने उपाययोंजना करण्याचे आश्वासन, पालघर शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला असून,यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पालघर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेंद्र गावित यांनी एका बैठकीत दिले. सध्या पालघर भागातील सातपाटी,मोरेकुरण,दापोली, उमरोळी,पंचाळी,पडघे,कमारे व अन्य काही गावांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असून,नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या गावांना पालघर नगर परिषदेसह २६ गावाना पाणीपुरवठा करण्यात येत असतो.पालघर हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे शहर असल्यामुळे पालघर नगरपरिषद क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नागरिकरण सुरु झाले आहॆ. दिवसागणिक नागरी संकुले उभी राहत आहेत.त्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली आहे.तसेच ग्रामीण भागातील २६ गावांना पुरेसे पाणी मिळत नाही.त्यासाठी वाढीव पाण्याची मागणी शासनाकडे…
नवीन पाटील,सफाळे केळवे येथे ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ शिबिर संपन्न, सफाळा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे एक दिवसीय स्वास्थ्य शिबिर केळवा रोड, रोठे येथील श्री अंबिका योग सेवा केंद्र,येथे नुकतेच पार पडले.विजय पाटील,नरेश पाटील,आणि भिका सोनवणे यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात २७ सदस्य सहभागी झाले होते. शिबिराची सुरुवात प्रार्थना,दीप प्रज्वलन, संस्थेची माहिती,प्रस्तावना तसेच संस्थेच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी,त्यानंतर अजित भाईनी ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त माहिती देऊन मार्गदर्शन केले.योग शरीरातील प्रत्येक पेशीला बरे करण्यासाठी आणि वाढवण्याचे कार्य करत असल्याने,तुमचे शरीर आपोआप अधिक रोगप्रतिकारक बनते,असे सांगितले.डायबेटिस हा रोग नाही,आपल्या आत्मशक्तीच्या जोरावर व डायबिटीसला इतर रोगाला दूर करू शकतो असे पुढे त्यांनी…
दीपक मोहिते, नेमकं दडलंय काय ? धनंजय मुंडेच्या आडून अजित पवार यांचा गेम ? गेल्या पंधरा दिवसापासून संतोष देशमुख हत्येचे प्रकरण राज्यभरात गाजत आहे.भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे.हत्येची घटना घडल्यानंतर आ.धस यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची एक ना अनेक प्रकरणे बाहेर काढली.त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुंडे यांचा कट्टर समर्थक असलेल्या वाल्मिक कराड याला पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागले.तर एक वगळता इतर सर्व आरोपी एकामागोमाग गजाआड झाले.सुरेश धस नंतर अंजली दमानिया व आता आ.चित्रा वाघ,यांनीही आता या प्रकरणात उडी घेतली आहे.संतोष देशमुख हे भाजपचे असून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात संतापाचे वातावरण निर्माण झाले…
