- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, जि. प. व पं. स. निवडणूक ; महायुतीचेच वर्चस्व, १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधकांचा पार सफाया केला.सर्वच्या सर्व जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांपैकी १११ पंचायत समित्यांवर महायुतीने आपला झेंडा फडकावला.काल लागलेल्या निकालातून प.महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा व रायगड या चार विभागात आम्हीच दादा आहोत, हे महायुतीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या तिन्ही पक्षाचे अक्षरशः पानिपत झाले. या तिन्ही पक्षांच्या हाती एकही जिल्हा परिषद लागली नाही. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक ०८ जिल्हा परिषदा जिंकून महायुतीमध्ये आपलाच दबदबा असल्याचे दाखवून…
दीपक मोहिते, १२ जि. प. व १२५ पं.स.साठी आज मतदान, आज १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्याच्या निवडणुका होत आहेत.या निवडणुकीत सुमारे २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीत एकूण ७ हजार ४३८ उमेदवार उभे आहेत. गेल्या काही वर्षांपासू रखडलेल्या या निवडणुका दोन किंवा तीन टप्यात होत आहेत.पहिल्या टप्यातील निवडणुक आज होत आहे.रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे,सातारा, सांगली,सोलापूर, कोल्हापूर,छ.संभाजीनगर,परभणी, धाराशिव व लातूर यांचा त्यामध्ये समावेश आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकूण २५ हजार ४७१ मतदानकेंद्रे स्थापन केली आहेत.वास्तविक या निवडणुका ५ फेब्रु.रोजी होणार होत्या.पण गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ही निवडणूकल…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” ( नॅशनल डेस्क ) लोकशाहीच्या मंदिरात पंतप्रधान असुरक्षित कसे ? चीनकडून लडाख परिसरात होणारी घुसखोरी व मोदी सरकारचे होत असलेले दुर्लक्ष,यावरून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्याची पाळी आली तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहातून पळ काढला.त्यामुळे विरोधी पक्षांनी सभात्याग केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या पंतप्रधानांना पाठीशी घालताना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संसदेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.मोदी यांची पाठराखण करताना ओम बिर्ला यांनी मोदी यांच्या जीवाला धोका असल्यामुळे,मी त्यांना आज सभागृहात येऊ नका, अशी सूचना केल्याचे सांगितले. त्यांच्या या…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या ” आईचा घो,” आपल्या शिक्षण व्यवस्थेत किती सावळागोंधळ आहे,हे एका मान्यताप्राप्त संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या खालवणे व शाळा बंद पडणे,हे प्रकार आपल्या पाचवीला पुजले असताना आता तिसरी धक्कादायक बाब ” यु डायस प्लस,” संस्थेच्या अहवालातून उघड झाली आहे.राज्यातील एकूण ३ हजार शाळेत गेली अनेक वर्षे विजेचा पत्ताच नाही.तसेच देशभरात विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊन ती आता २४.८ कोटींवर आली आहे.पण दुसरीकडे शिक्षकांची संख्या मात्र १ कोटी वर गेली आहे. सन २०१८- २२ दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या २६.३६ कोटी इतकी होती.त्यामध्ये १.५५ कोटीने घट होऊन २४.८१ कोटीवर आली आहे.विद्यार्थ्यांच्या…
दीपक मोहिते, न्यूजलाइन ( नॅशनल डेस्क ) भाग क्र. १, अखेर आपले विश्वगुरु हे जगदगुरु समोर झुकले.. अनेक वर्षे रखडलेला व अमेरिका – भारत दरम्यान होऊ घातलेला व्यापार करार अखेर मार्गी लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः भाईगिरी करत आपल्याला नाक घासत शरण यायला भाग पाडले आहे. या व्यापार कराराला मूर्तस्वरूप देण्यापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत,कृषी व आर्थिक क्षेत्रात कधीही तडजोड करणार नाही,असे छातीठोकपणे सांगत होते. पण, प्रत्यक्षात ते ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण घालत होते. ट्रम्प यांनी रशियाकडून तेलखरेदी व अमेरिकी मालावर झिरो शुल्क, या दोन जाचक अटी मोदी यांना मान्य करायला लावल्या. त्या बदल्यात अमेरिकेने भारताकडून आयात…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” सरकार इतकं घाबरतंय कशासाठी ? गेल्या दोन दिवसापासून लोकसभेत प्रचंड गोंधळ होत असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत – चीन सीमेवर घडलेली घटना आणि माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लिहिलेले ” फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी,” या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पित्त खवळले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह,गृहमंत्री अमित शहा व किरन रिजीजू यांनी सभागृहात गोंधळ करण्यास सुरुवात केली.त्यानंतर भाजपचे खासदार यांनी प्रचंड गोंधळ घालत राहुल गांधी यांना बोलू दिले नाही. माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी लिहिलेल्या पुस्तकात अनेक खळबळजनक घटनांवर लेख आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना हे पुस्तक प्रकाशित करू दिले नाही.त्यांच्या या लेखात आपले…
दीपक मोहिते, नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील यांच्या समोर असलेली आव्हाने… १ ) विकासकामात ठेकेदारांचा होत असलेला मनमानीपणा रोखणे व विकासकामांना वेग देणे, ( शहर स्वच्छता, वैद्यकीय सेवा, रस्त्याची दुरावस्था, अपुरा पाणीपुरवठा, मच्छर व भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट, प्रशासकीय कामकाजात सुधारणा, मनपाच्या स्वतःच्या मालकीच्या शाळा, रखडलेल्या रुग्णालयाचे काम जलदगतीने मार्गी लावणे, चार शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे, फेरीवाले व पार्किंग व्यवस्था करणे, नालेसफाईच्या कामातील बजबजपुरी रोखणे व मनपाची परिवहन सेवा अधिक प्रभावी करणे, ) २ ) करदात्यांची कैफियत व तक्रारी ऐकण्यासाठी तीन महिन्यातून एकदा ” तक्रार निवारण दरबार, ” चे आयोजन करणे,या दरबारात करण्यात येणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणे..…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” ७ फेब्रु.रोजी १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका, येत्या ७ फेब्रु. रोजी १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. एकूण ३४ जिल्हा परिषदापैकी पहिल्या टप्यात रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली,सोलापूर, कोल्हापूर, छ.संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या १२ जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे.प्रशासकीय राजवटीचा दीर्घकालीन अनुभव घेणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला आता या निवडणुकांमुळे दिलासा मिळणार आहे.या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली असून पहिल्या टप्यात होत असलेल्या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहतो,हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या निवडणूकासोबत सुमारे १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत.त्यामध्ये १ )…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थमंत्रीपदाची जणू लॉटरीच लागली, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण रद्द होणे,ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थखाते दिले जाणार नाही,ही काळ्या दगडावरची रेष होती.हे विलिनीकरण झाले असते तर अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात जयंत पाटील यांना द्यावे लागले असते.त्यामुळे सध्या फडणवीस यांनी हे मंत्रीपद तूर्तास आपल्याकडे ठेवले आहे.एकाच व्यक्तीकडे दोन महत्वाची खाती देणे,हे अत्यंत चुकीचे आहे.पण चूक किंवा योग्य या दोन शब्दाशी भाजपला कोणतेही देणेघेणे नाही.त्यामुळे फडणवीस यांनी योग्य खेळी करत गृह व अर्थ ही दोन्ही महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. अर्थखाते हे गृह खात्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे अत्यंत…
दीपक मोहिते, अर्थसंकल्प ; ” ख़ुशी कम, जादा गम,” शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या या अर्थसंकल्पामध्ये सरकारने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा मध्यमवर्गासाठी दिलासा देणारा नाही. भारताची दिशा ठरवणारा दस्तऐवज म्हणून भाजपचे नेते गुणगान गात असले तरी हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्याचा खेळ असल्याचे जाणवते. या अर्थसंकल्पातून सरकार दुरगामी विकासाचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न असल्याचे जरी सांगत असले तरी तो तसा नाही. आर्थिक स्थैर्यासोबत मूलभूत गरजांवर भर…
