दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
७ फेब्रु.रोजी १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका,
येत्या ७ फेब्रु. रोजी १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. एकूण ३४ जिल्हा परिषदापैकी पहिल्या टप्यात रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली,सोलापूर, कोल्हापूर, छ.संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या १२ जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे.प्रशासकीय राजवटीचा दीर्घकालीन अनुभव घेणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला आता या निवडणुकांमुळे दिलासा मिळणार आहे.या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली असून पहिल्या टप्यात होत असलेल्या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहतो,हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
या निवडणूकासोबत सुमारे १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत.त्यामध्ये १ ) रायगड – पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड व पोलादपूर,
२ ) रत्नागिरी – मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर,
३ ) सिंधुदुर्ग – वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला,
सावंतवाडी व दोडामार्ग,
४ ) पुणे – जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती व इंदापूर,
५ ) सातारा – खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव,वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण व कराड,
६ ) सांगली – आटपाडी, जत, खानापूर ( विटा ), कडेगाव, तासगाव, कवठेमहाकांळ, पलूस,वाळवा – ईश्वरपूर, शिराळा व मिरज,
७ ) सोलापूर – करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ,पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट,
८ ) कोल्हापूर – शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज व चंदगड,
९ ) छ. संभाजीनगर – सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छ. संभाजीनगर व पैठण,
१० ) परभणी – जिंतूर, परभणी, मानवत, सेतू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा,पालम व गंगाखेड,
११ ) धाराशिव – परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, लोहारा व उमरगा,
१२ ) लातूर – अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर ( अनंतपाळ ),देवणी, औसा व निलंगा,
इ.१२५ पंचायत समित्यांचा समावेश आहे.
या निवडणुका ५ फेब्रु. रोजी होणार होत्या, पण निवडणूक आयोगाने त्या ७ फेब्रु. रोजी होतील, असे जाहीर केले आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी ७ फेब्रु. ऐवजी ९ फेब्रु. रोजी होणार आहे.

