दीपक मोहिते,
जि. प. व पं. स. निवडणूक ; महायुतीचेच वर्चस्व,
१२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधकांचा पार सफाया केला.सर्वच्या सर्व जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांपैकी १११ पंचायत समित्यांवर महायुतीने आपला झेंडा फडकावला.काल लागलेल्या निकालातून प.महाराष्ट्र,
कोकण,मराठवाडा व रायगड या चार विभागात आम्हीच दादा आहोत, हे महायुतीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) भारतीय राष्ट्रीय
काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या तिन्ही पक्षाचे अक्षरशः पानिपत झाले. या तिन्ही पक्षांच्या हाती एकही जिल्हा परिषद लागली नाही. महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक ०८ जिल्हा परिषदा जिंकून महायुतीमध्ये आपलाच दबदबा असल्याचे दाखवून दिले आहे.शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या दोघांना प्रत्येकी दोन जिल्हा परिषदा जिंकता आल्या.तर पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेने ( शिंदे गट ) भाजप ( ५१ ) पाठोपाठ ३२ पंचायत समित्या जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २८ जागा जिंकुन ” हम भी कुछ कम नही,” हे दाखवून दिले आहे. पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही महायुतीने विरोधी पक्षाना डोके वर काढू दिले नाही. या निकालावरून उर्वरित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीतही महायुतीचा वरचष्मा राहील,असा अंदाज आहे.
जिल्हा परिषद निवडणूक – एकूण १२ जिल्हा परिषदा,
भाजप – ०८,
शिवसेना ( शिंदे गट ) – ०२,
राष्ट्रवादी काँग्रेस, ( अजित पवार ) – ०२,
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) – ००,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ००,
शिवसेना ( उबाठा ) – ००,
पंचायत समित्या निवडणुका, एकूण जागा – १२५,
भाजप – ५१,
शिवसेना ( शिंदे गट ) – ३२,
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) – २८,
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) – ०२,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०७,
शिवसेना ( उबाठा ) – ०५,
इतर – ००,

