दीपक मोहिते,
१२ जि. प. व १२५ पं.स.साठी आज मतदान,
आज १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्याच्या निवडणुका होत आहेत.या निवडणुकीत सुमारे २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीत एकूण ७ हजार ४३८ उमेदवार उभे
आहेत.
गेल्या काही वर्षांपासू रखडलेल्या या निवडणुका
दोन किंवा तीन टप्यात होत आहेत.पहिल्या टप्यातील निवडणुक आज होत आहे.रायगड,रत्नागिरी,
सिंधुदुर्ग,पुणे,सातारा,
सांगली,सोलापूर, कोल्हापूर,छ.संभाजीनगर,परभणी, धाराशिव व लातूर यांचा त्यामध्ये समावेश आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकूण २५ हजार ४७१ मतदानकेंद्रे स्थापन केली आहेत.वास्तविक या निवडणुका ५ फेब्रु.रोजी होणार होत्या.पण गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ही निवडणूकल दोन दिवस पुढे ढकलण्यात आली.त्यामुळे आज मतदान होत आहे व मतमोजणी .९ फेब्रु.रोजी करण्यात येणार आहे.सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.गेल्या निवडणुकांमध्ये भाजपने पहिला क्रमांक पटकावला होता. या निवडणुकीत भाजप आपला पहिला नंबर पुन्हा मिळवतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,

