Author: दीपक मोहिते

संजय लांडगे,वाडा, डाक विभागाचे मुंबईत राज्यस्तरीय प्रदर्शन : राज्यभर होणार पर्यटन दौरा, टपाल विभाग महाराष्ट्र व गोवा सर्कल यांच्या विद्यमाने दिनांक २२ ते २५ जाने.२०२५ दरम्यान मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे डाक विभागाचे राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भारताच्या समृद्ध व सांस्कृतिक वारसाला अधिक प्रमाणात जपणे,तसेच राज्यभरातील विविध ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून महत्वपूर्ण धार्मिक आणि सामाजिक,सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे, टपाल विभागाच्या विविध योजना व सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे, हा एक उद्देश या राज्यस्तरीय पर्यटनाच्या माध्यमातून साध्य केला जाणार आहे. शुक्र.१७ जाने.रोजी पालघर डाक विभागांतर्गत येणाऱ्या वज्रेश्वरी,या धार्मिक स्थळी या पर्यटन रॅलीचे आगमन होणार असुन या ठिकाणी सकाळी ९.०० ते दुपारी…

Read More

संजय लांडगे,वाडा, विद्यार्थ्यांमध्ये परिवहन व सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम संपन्न, वाड्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी सुरक्षा समिती व शालेय परिवहन समिती यांच्या संयुक्त जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते. काल आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये रस्ते अपघात टाळण्यासाठी जाणीव व जागृती व्हावी,या अनुषंगाने वसई विभाग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय थोरात यांच्या ( राज्य परिवहन विभाग )प्रमुख उपस्थितीत परिवहन विभागाचे उपनिरीक्षक श्रीपात भागवत यांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येताना व रस्त्याने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. वाहतुकीचे नियम समजून घेऊन पालकांमध्ये जनजागृती करावी तसेच एखाद्या रस्ता अपघाताच्या वेळी अपघातग्रस्तांची मदत करणे.हे आपले कर्तव्य आहे.हे समजावून सांगितले.१०८ क्रमांकावर फोन लावून…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आपल्या गृहविभागाचा कारभार दिवसेंदिवस लयाला, परवा मध्यरात्री सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात चोराने धारदार शस्त्राने हल्ला चढवला.या हल्ल्यात सैफ अली खान,हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान त्याची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याचे हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले आहे.या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.खंडणी उकळण्याच्या उद्देशाने या चोराने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.तसेच हा हल्लेखोर सिसीटीव्हीत कैद झाला आहे.त्यामुळे तो लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे. या घटनेने राज्यात आजच्या घडीला कोणीही सुरक्षित नाही,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.चार महिन्यांपूर्वी बदलापूर येथे लहान मुलीवर…

Read More

रुपेश संख्ये,पालघर, रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा – आ.राजेंद्र गावित, देवमोगरा फाउंडेशन ट्रस्ट संचलित सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स,पालघर यांच्या प्रथम वर्षाच्या जी.एन.एम.नर्सिंग विद्यार्थ्यांच्या दीपप्रज्वलन व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजेंद्र गावित उपस्थित होते.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात नर्सिंग व्यवसायाचे महत्त्व विशद केले. यावेळी आ.गावित म्हणाले की, ” नर्सिंग हे समाजसेवेतील एक महत्त्वाचे कार्य आहे.या व्यवसायात ” रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा,” हे व्रत ठेवून काम करणे,आवश्यक असते . नर्सिंग व्यवसाय हा मानवतेची सेवा करणारा आणि कौशल्याला अधोरेखित करणारा आहे.” फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचा संदर्भ देत आ.गावित म्हणाले, ” परिचारिका ही रुग्णांसाठी केवळ सिस्टर नसून आईसमान…

Read More

दीपक मोहिते, कायद्याची दहशत, गुंडाची घाबरगुंडी उडवणारा हा मकोक्का कायदा नेमका काय आहॆ ? संतोष देशमुख हत्याकांडातील संशियत आरोपी वाल्मिक कराड यांना मकोक्का कायदा लावण्यात आला.त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी तालुक्यात अक्षरशः हैदोस घातला.या कायद्याची एवढी दहशत का आहॆ ? चला याविषयी माहिती जाणून घेऊया. काय आहे हा कायदा ? कधी लावला जातो हा कायदा? काय आहे या कायद्यातील तरतुदी,यावर एक नजर, काय आहे मकोका कायदा ? महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट म्हणजेच मकोका कायदा,होय. संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी १९९९ मध्ये तो लागू करण्यात आला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला.हप्ता वसुली,खंडणी वसुली, अपहरण,हत्या,सामुहिक गुन्हेगारी,याविरोधात…

Read More

मनीष म्हात्रे,वसई, सोमवंशी क्षत्रिय समाजाचा ४५ वा क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ समाजाचा वार्षिक क्रिडा महोत्सव वस‌ईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यंदा या महोत्सवाचे यंदाचे हे ४५ वे वर्ष होते.११ व १२ जाने. २०२५ दरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानाच्या श्री साकाईदेवी क्रीडानगरीत समाजाचे विद्यमान अध्यक्ष नरेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मुंबई, दादर येथे संघाच्या स्वताच्या मालकीच्या जागेत अद्ययावत अशी बहुमजली वास्तू उभारणीचे काम सध्या सुरु असून या नियोजित उपक्रमास मोठ्या प्रमाणात देणगी या क्रिडा महोत्सवात जमा करण्यात आली. शनिवारी झालेल्या या उद्घाटन समारंभास अध्यक्ष नरेश राऊत,स्वागताध्यक्ष तसेच उमेळा गावचे माजी…

Read More

राजू परेड,जव्हार, व्यवसायिक असिफ शेख यांनी विद्यार्थ्यांना सांगितला यशाचा राजमार्ग, के.व्ही.हायस्कूल व आर.वाय. ज्युनियर कॉलेज येथे व्यवसाय करिअर मार्गदर्शन सप्ताहात दुसरे पुष्प गुंफतांना यशस्वी व्यावसायिक आसिफ रशीद शेख यांनी समाजमध्यामावरील रिल हे वास्तव जीवन नसून स्वतःचे प्रतिकूल परिस्थितीत जीवन हे वास्तव आहे,त्याला धैर्याने सामोरे जा असे आवाहन केले. शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य अवधूत गावड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आजच्या काळात आपण थोड्याशा प्रयत्नामध्ये यशाची स्वप्न पाहू लागतो त्यामुळे अपयश पदरी पडल्यानंतर निराश होतो. आपण निराश न होता ” प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे,” या उक्तीप्रमाणे आपल्या कठोर प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्यास आपणास नक्कीच यश मिळेल,याचा विश्वास आपल्या मनामध्ये जागवणारे मूर्तिमंत उदाहरण…

Read More

सचिन परब,विरार, विरार येथे सखी सोहोळ्याचे आयोजन, वसई विरार शहर मनपाच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती भारती देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ बहुजन विकास आघाडी,यंग स्टार ट्रस्ट,अमेय क्लासिक क्लब व विराट फाऊंडेशन तर्फे सखी सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे.१९ जाने.रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात नृत्य,गायन,विविध खेळ तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.यंदा होणाऱ्या सोहोळ्यात होम मिनिस्टर हा प्रसिद्ध खेळ ठेवण्यात आला आहे यंदा सोहोळ्याचे १५ वे वर्ष असल्यामुळे विजेत्या महिलांना ३ पैठण्यासोबत लकी ड्रॉ मध्ये विजेत्या महिलेला आकर्षक ” नथ, ” देण्यात येणार आहे.महिलांनी स्वतः साठी वेळ काढला पाहिजे,याकरिता महिलांसाठी…

Read More

दीपक मोहिते, ” जिल्हानिर्मिती,” प्रस्तावित नवीन २१ जिल्हे ; विकासाला गती।मिळणार.. येत्या २६ जाने. प्रजासत्ताक दिनी राज्यात २१ नव्या जिल्ह्याची निर्मीती होण्याची दाट शक्यता आहे.या नव्या जिल्ह्याचा समावेश झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्याची एकूण संख्या ५७ इतकी होणार आहे. १ मे १९६० रोजी राज्य निर्मितीच्या वेळेस एकूण २५ जिल्हे होते.गेल्या ६५ वर्षात नव्याने ११ जिल्ह्याची भर पडली आहे.आता राज्य सरकार अनेक जिल्ह्याचे विभाजन करून नवीन २१ जिल्हे स्थापणार आहे.त्यामध्ये भुसावळ,संगमनेर,श्रीरामपूर,अहेरी,महाड,शिर्डी,मंडणगड,जव्हार,पुसद,अचलपूर, साकोली,बारामती,खामगाव,कल्याण,मीरा-भाईंदर, कळवण,किनवट,मालेगाव,अंबेजोगाई,उदगीर व माणदेश,यांचा त्यामध्ये समावेश आहे.नवा जिल्हा स्थापन करताना राज्यशासनाच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडत असतो.त्यामुळे राज्यसरकारने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने पालघर जिल्हा निर्मितीचा प्रश्न सुमारे तीन दशके लोंबकळत ठेवला…

Read More

सुनीता चव्हाण,पालघर, जलजीवन मिशन संदर्भात जिल्हास्तरीय प्रशिक्षण, जल जीवन मिशन पुर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांचे हस्तातंरण करून संचालन,देखभाल व दुरूस्ती विषयक ग्रामपंचायतीमधील पाच निवड केलेल्या प्रतिनिधींचे दुसऱ्या टप्यातील ( स्तर-3 ) चे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन काल बायफ कार्यालय जव्हार येथे करण्यात आले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण संपन्न झाले. जल सुरक्षक,ग्रामपंचायत अधिकारी,बचत गट सदस्य, आशा वर्कर,ग्रामपंचायत सदस्य आदी प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तिला ५५ लिटर प्रमाणे कुटूंबाला शाश्वत शुद्ध पाणी पुरवठा जलजीवन मिशन योजनेतून करावयाचे आहे. यामध्ये सर्वांनी यामध्ये…

Read More