मनीष म्हात्रे,वसई,
-
- सोमवंशी क्षत्रिय समाजाचा ४५ वा क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा,
पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ समाजाचा वार्षिक क्रिडा महोत्सव वसईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यंदा या महोत्सवाचे यंदाचे हे ४५ वे वर्ष होते.११ व १२ जाने. २०२५ दरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानाच्या श्री साकाईदेवी क्रीडानगरीत समाजाचे विद्यमान अध्यक्ष नरेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
मुंबई, दादर येथे संघाच्या स्वताच्या मालकीच्या जागेत अद्ययावत अशी बहुमजली वास्तू उभारणीचे काम सध्या सुरु असून या नियोजित उपक्रमास मोठ्या प्रमाणात देणगी या क्रिडा महोत्सवात जमा करण्यात आली.
शनिवारी झालेल्या या उद्घाटन समारंभास अध्यक्ष नरेश राऊत,स्वागताध्यक्ष तसेच उमेळा गावचे माजी सरपंच भालचंद्र चौधरी,प्रमुख अतिथी माजी आ.हितेंद्र ठाकूर,उद्घाटक सुधीर म्हात्रे,माजी अध्यक्ष तथा विश्वस्त विलास बंधू चोरघे, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाचे कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे,वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन आशय राऊत,विरार येथील प्रसिद्ध उद्योजक दयानंद पाटील,विश्वस्त नमिता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.तर दूस-या दिवशी रविवारी पारितोषिक वितरण व समारोप समारंभात अध्यक्ष नरेश राऊत,प्रमुख अतिथी प्रशांत चव्हाण,विशेष अतिथी वसई विकास सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष राऊत,वसई सो.क्ष. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र राऊत,समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमन नितीन म्हात्रे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन क्रीडा समितीचे समन्वयक आणि संघचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी केले.क्रीडा समिती प्रमुख नितीन पाटील, माजी समन्वयक आणि विद्यमान उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे,संघचिटणीस विविध पाटील खजिनदार प्रमोद पाटील,मनीष वर्तक,प्रविण वर्तक,जोया चौधरी,सेजल वर्तक,यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले.
सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघाच्या वतीने आयोजीत दोन दिवस चाललेल्या क्रिडा महोत्सवात सांघिक व वैयक्तीक खेळाचे प्रदर्शन समाजातील मूले-मूलीनी सो.क्ष.समाजाच्या विविध शाखेतर्फे आयोजित महोत्सवात सहभागी होऊन दाखवला.या क्रिडा महोत्सवाच्या माध्यमातून पुढे आलेल्या समाजातील अनेक खेळाडूंनी परदेशातील अँथलेटिक्स स्पर्धेत भाग घेऊन आपल्या खेळाची चुणूक दाखवली आहे.सो.क्ष.समाजाच्या ४५ व्या क्रिडा महोत्सवात सांघीक क्रिडा प्रकारात कबड्डी, खो-खो,शुटींग बॉल,थ्रो बॉल, लगंडी तसेच वैयक्तीक क्रिडा प्रकारात धावणे,थाळीफेक, बँडमींटन,रायफल शुटींग,भालाफेक व इतर मैदानी खेळांचा समावेश करण्यात आलेला होता.बोर्डी ते मुंबई,ठाणे,पुणे तसेच परदेशात समाजाच्या ५२ शाखा असून त्यातील एकूण २००० स्पर्धक सहभागी झाले होते.तर जवळपास पाच हजारांहून अधिक समाजबांधवानी या महोत्सवात हजेरी लावली होती.
सोमवंशी क्षत्रिय समाजाचा क्रिडा महोत्सव हा वाडवळ-पाचकळशी समाजाचा मानबिंदू असून या महोत्सवाच्या रूपाने आबाल-वृद्ध एकत्र येऊन आपल्या संघशक्तीचे प्रदर्शन करत असतात.संघाच्या माध्यमातून यूवा मेळावा, महिला मेळावा तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते.या समाजाची होणारी प्रगती हि नेहमीच मान उंचवणारी असून समाजातील कर्तबदार व्यक्तींनी आपली छाप विविध क्षेत्रात उमटवली आहे.पर्यटन,राजकीय,व्यवसाय,वैद्यकीय,शेती,पत्रकारीता,
शैक्षणिक,अभीनय,निवेदन,
अशा अनेक क्षेत्रात कौशल्य व कलागुणांनी या समाजातील लोक नावारूपास आलेले आहेत.२०२० हे सो.क्ष.संघाचे शताब्दी महोत्सव होते.पुढील वर्षी हा महोत्सव विरार येथे भरवण्यात येणार आहे.
- सोमवंशी क्षत्रिय समाजाचा ४५ वा क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा,

