सचिन परब,विरार,
विरार येथे सखी सोहोळ्याचे आयोजन,
वसई विरार शहर मनपाच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती भारती देशमुख यांच्या स्मृति प्रित्यर्थ बहुजन विकास आघाडी,यंग स्टार ट्रस्ट,अमेय क्लासिक क्लब व विराट फाऊंडेशन तर्फे सखी सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे.१९ जाने.रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात नृत्य,गायन,विविध खेळ तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.यंदा होणाऱ्या सोहोळ्यात होम मिनिस्टर हा प्रसिद्ध खेळ ठेवण्यात आला आहे यंदा सोहोळ्याचे १५ वे वर्ष असल्यामुळे विजेत्या महिलांना ३ पैठण्यासोबत लकी ड्रॉ मध्ये विजेत्या महिलेला आकर्षक ” नथ, ” देण्यात येणार आहे.महिलांनी स्वतः साठी वेळ काढला पाहिजे,याकरिता महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये उखाणा घेणे,आपली कला सादर करणे,असे विविध ” वन मिनिट गेम्स,” व मनोरंजन खेळ खेळण्यात येणार आहेत.बहुजन विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक व नगरसेविका, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट संघ तसेच उत्कृष्ट नृत्य निवडण्यात येणार असून आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. दू.३.०० ते ८.०० वाजेपर्यंत विरार पश्चिम यशवंत नगर येथील अमेय क्लासिक क्लब शेजारी मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहोळ्यात हळदी कुंकूचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांना यावेळी वाणाचे वाटप करण्यात येणार आहे.

