सुनीता चव्हाण,पालघर,
जलजीवन मिशन संदर्भात जिल्हास्तरीय प्रशिक्षण,
जल जीवन मिशन पुर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांचे हस्तातंरण करून संचालन,देखभाल व दुरूस्ती विषयक ग्रामपंचायतीमधील पाच निवड केलेल्या प्रतिनिधींचे दुसऱ्या टप्यातील ( स्तर-3 ) चे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन काल बायफ कार्यालय जव्हार येथे करण्यात आले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण संपन्न झाले.
जल सुरक्षक,ग्रामपंचायत अधिकारी,बचत गट सदस्य, आशा वर्कर,ग्रामपंचायत सदस्य आदी प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तिला ५५ लिटर प्रमाणे कुटूंबाला शाश्वत शुद्ध पाणी पुरवठा जलजीवन मिशन योजनेतून करावयाचे आहे. यामध्ये सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन आपले गाव हर घर जल घोषित करावयाचे आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी यावेळी केले.
महिला बाल विकास अधिकारी प्रविण भावसार, जव्हार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांनी भेट देवून मार्गदर्शन केले.
पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना सागरी,नागरी व डोंगरी स्वरूपाची असून उन्हाळी ग्रामीण भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. शासनाच्या जल जिवन मिशन अंतर्गत ५८८ पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेवून नैसर्गिक स्रोताचे संवर्धन करून नवीन स्रोत निर्माण करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून सर्व ठिकाणी योजना पुर्ण करण्यात येणार आहेत.अशी माहीती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

