दीपक मोहिते,
कायद्याची दहशत,
गुंडाची घाबरगुंडी उडवणारा हा मकोक्का कायदा नेमका काय आहॆ ?
संतोष देशमुख हत्याकांडातील संशियत आरोपी वाल्मिक कराड यांना मकोक्का कायदा लावण्यात आला.त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी तालुक्यात अक्षरशः हैदोस घातला.या कायद्याची एवढी दहशत का आहॆ ? चला याविषयी माहिती जाणून घेऊया.
काय आहे हा कायदा ? कधी लावला जातो हा कायदा? काय आहे या कायद्यातील तरतुदी,यावर एक नजर,
काय आहे मकोका कायदा ?
महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अॅक्ट म्हणजेच मकोका कायदा,होय. संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी १९९९ मध्ये तो लागू करण्यात आला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला.हप्ता वसुली,खंडणी वसुली, अपहरण,हत्या,सामुहिक गुन्हेगारी,याविरोधात मकोका लावला जातो.संघटीत गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला.हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही.
कायद्यात काय आहेत तरतुदी ?
मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील,तेव्हा लावण्यात येतो. या कायद्यात पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना १८० दिवसाचा कालावधी मिळतो. हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही.मकोका कायदा केव्हा लावला जातो ? एका आरोपीवर दोन पेक्षा अधिक आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील,तेव्हाच हा कायदा लावला जातो.या कायद्यातंर्गत आरोपीचा कबुलीजबाब नोंदवता येतो. त्या कबुलीजबाबाचा वापर इतर सहआरोपींसाठी करता येतो.मकोको कायदा फरार आरोपीवर लावता येतो.त्याची संपत्ती जप्त व बँक खाती गोठवता येते.
या कायद्यामुळे आरोपींना होऊ शकते जन्मठेप,
बीड प्रकरणातील आरोपींना मकोका का लावला ?तपास अधिकाऱ्यांना मकोका लावण्यासाठी हे आरोपी टोळी म्हणून काम करत होते,हे सकृतदर्शनी दिसून आले. त्यामुळे हा कायदा लावण्यात आला.मकोका कायदा कठोर आहे.हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही.यामध्ये किमान शिक्षा पाच वर्षांची व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. तसेच या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांवरही कारवाई होते. तसेच आरोपींची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात येते. त्याची बँक खाती गोठवता येतात.त्यामुळे गुंडाना या कायद्याची प्रचंड भिती वाटते.

