संजय लांडगे,वाडा,
विद्यार्थ्यांमध्ये परिवहन व सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम संपन्न,
वाड्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी सुरक्षा समिती व शालेय परिवहन समिती यांच्या संयुक्त जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते.
काल आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये रस्ते अपघात टाळण्यासाठी जाणीव व जागृती व्हावी,या अनुषंगाने वसई विभाग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय थोरात यांच्या ( राज्य परिवहन विभाग )प्रमुख उपस्थितीत परिवहन विभागाचे उपनिरीक्षक श्रीपात भागवत यांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येताना व रस्त्याने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. वाहतुकीचे नियम समजून घेऊन पालकांमध्ये जनजागृती करावी तसेच एखाद्या रस्ता अपघाताच्या वेळी अपघातग्रस्तांची मदत करणे.हे आपले कर्तव्य आहे.हे समजावून सांगितले.१०८ क्रमांकावर फोन लावून अपघाताच्या वेळी रुग्णवाहिका बोलून रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करावी.असे आवाहन. त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस विशाल कुलकर्णी शाळेचे मुख्याध्यापक संजय महाजन उपमुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी,पर्यवेक्षिका सुमन सूर्यवंशी,शालेय परिवहन समितीचे अविनाश निकुंभ,शकुंतला चौधरी, शैलजा पाटील,चंद्रशेखर खैरनार,विद्यार्थी सुरक्षा समितीचे विक्रांत पाटील, अनंता लोखंडे वैष्णवी ठाकरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल भोईर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक,शिक्षिका यांनी बहुमोल सहकार्य केले.

