संजय लांडगे,वाडा,
डाक विभागाचे मुंबईत राज्यस्तरीय प्रदर्शन :
राज्यभर होणार पर्यटन दौरा,
टपाल विभाग महाराष्ट्र व गोवा सर्कल यांच्या विद्यमाने दिनांक २२ ते २५ जाने.२०२५ दरम्यान मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे डाक विभागाचे राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
भारताच्या समृद्ध व सांस्कृतिक वारसाला अधिक प्रमाणात जपणे,तसेच राज्यभरातील विविध ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून महत्वपूर्ण धार्मिक आणि सामाजिक,सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे, टपाल विभागाच्या विविध योजना व सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे, हा एक उद्देश या राज्यस्तरीय पर्यटनाच्या माध्यमातून साध्य केला जाणार आहे.
शुक्र.१७ जाने.रोजी पालघर डाक विभागांतर्गत येणाऱ्या वज्रेश्वरी,या धार्मिक स्थळी या पर्यटन रॅलीचे आगमन होणार असुन या ठिकाणी सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी डाक विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजना,सेवा, बचत योजना यांची माहिती दिली जाणार आहे.या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते,आरोग्य कर्मचारी, शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन पालघर विभागाचे डाक अधिक्षक रमेश अवताडे यांनी केले आहे.

