Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यातील नरेगाच्या कामांची पाहणी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर,रविंद्र शिंदे यांनी आज वाडा तालुक्याला भेट देऊन नरेगाच्या कामांची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प. ) चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( नरेगा ) अतुल पारसकर,गटविकास अधिकारी पं.स.वाडा,इ.अधिकारी उपस्थित होते.ही पाहणी झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत सुरु असलेल्या डीएस-गवळी पाडा,बाळा कडु यांच्या शेताजवळील बंधाऱ्यातील गाळ काढणे,या कामाला भेट दिली.सदर कामावर १४८ मजुर हजर होते.या भेटी दरम्यान रविंद्र शिंदे यांनी मजुरांची विचारपुस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तसेच पं.स.वाडा,ग्रामपंचायत परळी अंतर्गत सुरु असलेल्या एनएस-कदल नाला सरळीकरण करणे,या कामाला भेट…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वर्गाचा मॉनिटर आता शिपायाच्या भूमिकेत, देवेंद्र फडणवीस यांना मानलं बुवा,त्यांनी गेली अडीच वर्षे कार्यरत आलेल्या वर्गाच्या मॉनिटरला थेट शिपाई बनवले. बारा दिवस आढेवेढे घेणारे एकनाथ शिंदे यांनी शिपाई म्हणून काल सूत्रे हाती घेतली व भाजपवाल्यांचा जीव भांड्यात पडला.दुसरा आणखी एक शिपाई गुलाबी जाकीट घालून ” जी साब,जी साब,” बोलण्यासाठी सज्ज झाला आहे.या सर्व घटनाक्रमाने स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.आजवर एकाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर अशी पाळी आली नव्हती,ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली.असो ” राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य,” असते.एका मराठ्याला अशाप्रकारची मानहानी स्विकारावी लागली,याचे मनोज जरांगे पाटलाना देखील वाईट वाटले असावे.ज्या शिंदे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.२ ग्रामीण शिक्षण व्यवस्था, ग्रामीण भागातील जि.प.च्या प्राथमिक शाळा वाचवण्याचे  नव्या सरकारपुढे मोठे आव्हान, राज्याचे शिक्षण विभाग,हे कायम निद्रावस्थेत असलेले पाहायला मिळते.गेल्या काही वर्षात या विभागाचा कारभार इतका सैरभैर झाला आहे,की ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था मोडीत निघते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यास अधिकारीवर्गाचा भ्रष्ट कारभार व लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत ठरली आहे. गेल्या काही वर्षात राज्यात खाजगी शाळांचे वारेमाप पीक आले आहे.राज्य सरकारच्या या विभागाने खाजगी शिक्षण संस्थांना मुक्तहस्ते परवानग्या दिल्यामुळे खाजगी शाळा पावसाळ्यात रानात उगवणाऱ्या छत्र्यासारख्या उगवल्या.परिणामी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद हळूहळू मृत्युशय्येवर जाऊ लागल्या.आजच्या घडीला राज्यातील हजारो शाळांनी अखेरचा श्वास घेतला…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, महायुतीच्या सरकारचा शपथविधी ; घोडं अखेर गंगेत न्हालं.. तब्बल १२ दिवसानंतर आज अखेर तीन इंजिन सरकारचा शपथविधी आझाद मैदानात पार पडला.फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली.तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर चेहरा करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.यावेळी उपस्थित असलेल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली असली तरी,या समारंभावर नाराजीची गडद छाया पडली होती.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर गंभीर चेहरा करून बसलेले पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते.भाजपला मिळालेल्या जागा लक्षात घेता मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच जाणार,हे नक्की होते.पण एकनाथ शिंदे त्यास तयार नव्हते.त्यांनी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१, ” शेतीसिंचन,” शेतीसिंचनासाठी पाणी ; नवनिर्वाचित खासदार व आमदारांनी सरकार दरबारी प्रयत्न करायला हवेत, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.या निवडणुकीत भाजपने वसई,नालासोपारा व विक्रमगड तर शिवसेनेने ( एकनाथ शिंदे गट ) पालघर व बोईसर,अशा एकूण पाच जागा जिंकल्या.सहावी डहाणूची जागा मात्र त्यांना जिंकता आली नाही.ही जागा मार्क्स.कम्यु.कडेच राहिली.या निवडणुकीतही भाजपला मार्क्स.कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या तलासरी तालुक्यात दमदार कामगिरी करता आली नाही.त्यामुळे ही जागा त्यांना जिंकता आली नाही. आता निवडणुका पार पडल्या असून भाजपने या जिल्ह्यावर आपली चांगली पकड निर्माण केली आहे.जिल्हापरिषद,अनेक पंचायत समित्या,नगरपरिषदा, नगरपंचायती महायुतीच्या ताब्यात आहेत.मात्र…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिच्चारे एकनाथ शिंदे,नियती कोणाला सोडत नाही,हेच खरं… काल सायंकाळी एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक सुधारली व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात बंड करताना ते सुरत – गोवामार्गे गुवाहातीला गेले होते.यावेळी तसं न करता हेलिकॉप्टरने थेट आपल्या ” दरे,” गावी निघून गेले.” जैसी करनी,वैसी भरनी,” चा एक एपिसोड येथे संपला. त्यांना जडलेला आजार हा राजकीय होता,की त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या.यावर सध्या उलटसुलट चर्चा होत आहे.असो,पण आज एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जाणे कितीला पडले,यावर राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.राजकरणात कोण कोणाचा नसतो,हे शिंदे यांनीच अडीच वर्षांपूर्वी…

Read More

दीपक मोहिते, ” रस्सीखेच,” पालघरचे पालकमंत्रीपद पुन्हाकडेच,रविंद्र चव्हाण यांची पुन्हा वर्णी लागणार… पालघरचे पालकमंत्री पद हे भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्याकडे पालघर व सिंधुदुर्ग,अशा दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते.पण आता नितेश राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे सोपवले जाणार आहे.त्यामुळे पालघरच्या पालकमंत्रीपदी रविंद्र चव्हाण यांना पुढे चाल मिळण्याची दाट शक्यता आहे.शिंदे गटाचे पालघरचे आ.राजेंद्र गावित हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत,पण जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकहाती जिंकणाऱ्या रविंद्र चव्हाण यांना पहिली पसंती मिळेल असे वाटते. पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांनी वरील दोन्ही जिल्ह्यात सरस कामगिरी केली,तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात चांगले…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता मलईदार खात्यासाठी तीन इंजिनच्या सरकारमध्ये मॅरेथॉन स्पर्धा सुरू… निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण ? व कोणती खाती कोणाला ? या दोन प्रश्नाची उत्तरे शोधण्यात महायुती अपयशी ठरली आहे.मुख्यमंत्रीपद भाजपला द्यायचे ठरल्यानंतरही उमेदवाराचा चेहरा कोण ? हे जाहीर करण्यात भाजपचे केंद्रीय नेते मागेपुढे का करत आहेत,याचा उलगडा होत नाही.एकनाथ शिंदे हे मुंबईला परतले असले तरी त्यांचा राजकीय आजार अद्याप आटोक्यात आल्याचे दिसत नाही.अडीच वर्षांपूर्वी आपण जो डाव खेळलो,तो डाव आपल्यावर बुमरॅग होईल,असे त्यांना वाटले नव्हते.पण तो अखेर उलटलाच,” उसके घर देर है,पर अंधेर नही,” याची प्रचिती एकनाथ शिंदे यांना गेल्या आठ…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मनसे ; आता पुन्हा सावरणे जरा कठीणच… या निवडणुकीतील निकाल पाहता राज यांची मनसे पुन्हा निवडणुका लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.पालघर व ठाणे जिल्ह्यात मनसेचा झालेला दारुण पराभव लक्षात घेऊन त्यांचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला होता.पण अचानकपणे त्यांना नैतिकतेचा विसर पडला व त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.पण त्यांच्या या कृतीचे पालघर म्हणा की ठाणेवासियाना बिलकुल आश्चर्य वाटले नाही. सर्वच्या सर्व म्हणजे १२८ उमेदवाराचा पराभव होणे,हा प्रकारच मुळात जिव्हारी लागणारा होता,त्यापैकी ६० ते ७० उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होणे,हे तर त्याहून जिव्हारी लागणारे ठरले.पण या पराभवातून राज व त्याचे फंटर्स काही…

Read More

दीपक मोहिते, भयाण वास्तव, पाणीटंचाई ; वेळीच सावध न झाल्यास जगभरात हाहाकार उडेल…. राज्याच्या यंदा चांगला पाऊस होऊनही अनेक जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.जगातील अनेक देशांनाही या समस्येने चांगलेच घेरले आहे.दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन या शहरात चार दिवस आड पाणी सोडण्यात येत आहे.पण आपण पाणी बचत,पाण्याचा अपव्यय टाळणे,भूगर्भातील पाण्याचा अविरत होणारा पाणीउपशा व पर्यावरणाचे संवर्धन या महत्वाच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. जगात सध्या नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली असल्याचे जाणवू लागले आहे.झाडांची कत्तल,डोंगर पोखरणे,वनजमिनी बळकावणे व भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपशा,अशा कारणांमुळे मानवी जीवन आता धोक्यात आले आहे.यामध्ये भूगर्भातील पाण्याचा होणाऱ्या अविरत उपशामूळे आज अनेक…

Read More