- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ३१ डिसें.च्या पार्श्वभूमीवर रिसॉर्टस हाऊसफुल्ल, नाताळ व नववर्ष स्वागत दिनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेले रिसॉर्टस आतापासूनच हाऊसफुल्ल झाले आहेत.त्यामुळे मुंबई,ठाणे परिसरातील अनेक पर्यटकांनी आता आपला मोर्चा अलिबाग,मुरुड-जंजिरा, लोणावळा-खंडाळा या परिसराकडे वळवला आहे. डिसेंबर महिन्यात अनेक सुट्या असल्यामुळे चाकरमान्यांनी आपल्या कुटुंबियांसह समुद्रकिनारी असलेल्या निसर्गरम्य पहिली पसंती दिली.पण येथे असलेल्या तमाम रिसॉर्टसची बुकिंग एक महिन्याअगोदर झाल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली.” स्वस्त आणि मस्त,” अशी ही रिसॉर्टस मुंबईपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेल्या अर्नाळा,कळम्ब,नवापूर- राजोडी,या परिसराला पर्यटक प्राधान्य देत असतात.या रिसॉर्टसमध्ये डीजे,तरणतलाव,रेनडान्स,शाकाहारी/मांसाहारी जेवण,चहा/नाश्ता आदींची रेलचेल असल्यामुळे तरुणाई नाताळ व नववर्ष दिन येथे साजरा करण्यासाठी गर्दी करत असतात.परंतु ही सारी रिसॉर्टस…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” दादा भुसे यांनी राज्याच्या शिक्षण विभागापासून सुरू करावे… नवनिर्वाचित शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील गरीब मुलांना चांगले शिक्षण देऊ,असे जाहीर केले आहे.त्यांच्या या वक्तव्याचे राज्याच्या जनतेने स्वागत करायला हवे.त्यांच्या या वक्तव्याचे सध्या वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहे.आतापर्यंत देण्यात आलेले शिक्षण चांगले नव्हते का ? असा प्रश्न नक्कीच तुमच्या-आमच्या मनात उभा ठाकतो. असो,पण त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खरी ठरो,अशी आपण प्रार्थना करूया.मात्र हा निर्णय घेताना त्यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सद्यस्थिती,शिक्षणाचा सुमार दर्जा,खालावत चाललेली विद्यार्थ्यांची पटसंख्या,बंद पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा व राज्याच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार,या सर्व गैरप्रकारावर आळा घालण्याचे काम त्यांनी करायला हवे.तसे झाले तरच…
दीपक मोहिते, ” इनसाईड स्टोरी,” नेपाळ येथे माओवाद्यांची बैठक ; घडामोडींची शहानिशा होणे आवश्यक … चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सनसनाटी दावा केला होता.ते म्हणाले,महाराष्ट्र राज्य विस्कळीत करण्यासाठी नेपाळ या आपल्या शेजारी असलेल्या देशात माओवाद्यांची एक बैठक झाली.या बैठकीस राज्यातील काही अर्बन नक्षलवादी उपस्थित होते.त्यांच्या या दाव्यात तथ्य असेल तर ती चिंतेची बाब आहे.त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याची सखोल चौकशी होणे,गरजेचे आहे. हा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्वाचे चार निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.ईव्हीएम मशीनच्या वापरा विरोधात एल्गार पुकारणे,मुस्लिम,दलित व ओबीसी संघटनाना रस्त्यावर उतरवून सरकारविरोधात वातावरण तयार करणे, सरकारविरोधात आरपारची लढाई उभी करणे व संविधान…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्ह्याचे दुःख संपणार तरी कधी ? पालघर जिल्ह्याला यंदाही मंत्रिपद न लाभल्यामुळे सलग चौथ्यांदा बाहेरचा पालकमंत्री लादला जाणार, हे आता निश्चित झाले आहे.त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव चर्चेत आहे. पालघर जिल्ह्याला प्रत्येक सरकारने कायम सावत्रपणाची वागणूक दिली.जिल्ह्याचा पालकमंत्री,हा त्याच जिल्ह्याचा मंत्री असावा,अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.कारण त्या मंत्र्याला जिल्ह्यातील समस्या,प्रश्न व लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींची कल्पना असते.पण गेल्या दहा वर्षात पालघर जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपद आले नाही.तत्कालीन आदिवासी विकासमंत्री कै.विष्णू सवरा यांनी काही काळ पालकमंत्री म्हणून काम पाहिले,त्यानंतर मालेगावचे दादा भुसे व ठाणे जिल्ह्याचे रविंद्र चव्हाण,हे दोघे पालकमंत्री झाले. कोरोना काळात पालकमंत्री दादा भुसे,हे क्वचितच पालघर…
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड,आलोंडा/तांबडमाळ येथे आंनदाश्रमचे भुमिपुजन, पूर्वीकाळी गुरुकुल पद्धतीने जे शिक्षण घेतले जात होते,त्याच धर्तीवर या आनंदाश्रमामध्ये शिक्षण देण्यात येणार आहे. आज या आनंदाश्रमचे भूमिपूजन पार पडले. या आनंदाश्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे व राष्ट्र स्वाभिमानाचे शिक्षण देऊन त्यांना सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचे गुरुकुल शिक्षण दिले जाणार आहे. ह. भ.प.हरिश्चंद्र कुवरा महाराज यांच्या संकल्पनेतून हे आनंदाश्रम उभे राहत आहे. या भूमिपूजन सोहळ्याला महंत बालयोगी गणेश दाजी उदासीन,आचार्य देवलिंग महादलिंग जंगम गुरुजी,महंत मोहनदास महाराज,ओलोक नाथ महाराज,भारतनंदजी सरस्वती महाराज,दादा महाराज कुवरा,बालकनाथ महाराज कावळे मठ लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सावरा आ.हरिश्चंद्र भोये आदी मान्यवर उपस्थित होते.
जव्हार,प्रतिनिधी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, खरवंद गाव,तालुका जव्हार, येथील शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवड,सेंद्रिय कीड व्यवस्थापन, व काढणी पश्चात व्यवस्थापन,या विषयांवर नुकताच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तालुका कृषी विभाग,जव्हार व जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.हरभरा लागवड हा २०२४-२५ या राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानाचा एक महत्त्वाचा भाग असून, त्याची देखरेख तालुका कृषी विभागाकडून करण्यात येते. या उपक्रमांतर्गत २० शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते, कीड नियंत्रक आणि बहु-पोषक द्रव्ये पुरविण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान,सुनील महाला यांनी सेंद्रिय खतांचा वापर,जमिनीची पोषक पातळी राखणे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर,याविषयी माहिती दिली.त्यांनी हरभरा लागवडीसाठी वनस्पती-आधारित कीटकनाशकांचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना त्याचा…
संदीप जाधव,बोईसर, वनसंपदेचा विनाश, प्रशासनाचा ढिसाळ कारभार, पालघर तालुक्यातील किराट गावात वनविभागाच्या सीमेलगत सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकामांमुळे पर्यावरण,वन्यजीव आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरुंग स्फोट केले जात असून,निसर्गाचा ऱ्हास,भूकंपासारखे धक्के, आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेले दुष्परिणाम स्पष्ट दिसून येत आहेत.मात्र,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गैरप्रकाराला आळा घालण्याऐवजी तो वाढत चालला आहे. किराट गावातील अनेक घरांतील लोक स्फोटांमुळे होणाऱ्या भूकंपसदृश धक्क्यांमुळे भीतीच्या वातावरणात जगत आहेत.सततच्या स्फ़ोटामुळे त्यांच्या घरांमध्ये तडे जात आहेत.या अशा वातावरणामुळे त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही महसूल आणि वनविभाग या प्रकरणी डोळेझाक करत आहेत. स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार,…
वसंत भोईर,वाडा, २५ हजार रु.ची अपेक्षा व्यर्थ : नोंदणीसाठी उरले केवळ नऊ दिवस, दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रु.बोनस देण्याची घोषणा केली. याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रति हेक्टरी पंचवीस हजार रु.बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र वाढीव बोनसचे देण्यात।आलेले आश्वासन हवेत विरले. या अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फारशी चर्चा झाली नाही.शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बोनसच्या प्रश्नाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.धानउत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी धानाला बोनस जाहीर केला जातो.युती सरकारने वीस हजार रु.हेक्टरी बोनस जाहीर केला…
सुरेश काटे,तलासरी, तलासरी येथे तालुकास्तरीय अन्नप्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे आयोजन, तलासरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कऱण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सध्या सुरु असलेले प्रक्रिया व नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज कार्यपद्धती, 35% अनुदान,10% स्व:हिस्सा,55% कर्ज याप्रमाणे 2.00 लाखांपर्यंत प्रकल्प तयार करणे,इ. विषयावर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वप्नील पष्टे यांनी केले.अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन करणे,प्रकल्प अहवाल तयार करून बॅक कर्ज प्रक्रिया करण्यासाठी अर्जदारास पुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे.अर्जदाराने कोटेशन, आधारकार्ड,बॅक पासबुक, लाईट बील,उद्योग ठिकाण पुरावा,पॅनकार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे व्हाटसअप केले तरी चालेल, अशी माहिती स्नेहल वाकडे यांनी दिली. असंघटित…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” छगन भुजबळ ” दे धक्का,” देण्याच्या तयारीत… मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर संतापलेल्या छगन भुजबळ यांनी आता महायुती सरकारला ” दे धक्का,” देण्याची तयारी चालवली आहे.सध्या ते ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत सतत बैठका घेत असून शरद पवार गटात सामील होणे किंवा स्वतःची ओबीसी संघटना उभी करणे,अशा दोन पर्यायावर विचार करत आहेत. या दोन पर्यायापैकी ओबीसी संघटना उभारून राजकारणात सक्रिय होण्याचे त्यांनी ठरवले तर ते महायुतीला फार मोठा धक्का ठरू शकतो.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने महायुतीला भरभरून मते दिली होती.ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये,यासाठी छगन भुजबळ यांनी एकाकी किल्ला लढवला होता.मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांना…
