Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” राज्याची अधोगती,” संतोष देशमुख हत्या ; आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू पुसणाऱ्याना नियती सोडणार नाही, राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे बीड जिल्ह्याची ओळख,” गुन्हेगारीचा जिल्हा,” अशी झाली आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीची प्रकरणे एकामागोमाग बाहेर येत असूनही आपले मायबाप सरकार जागे व्हायला तयार नाही.त्यांच्याच पक्षाचे आ.सुरेश धस यांनी सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली आहेत.पण सरकार त्यातून काही बोध घ्यायला तयार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत,त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.त्यांनी ही मागणी करताना मुंडे यांचे वाल्मिक कराड यांचे एकमेकांशी कसे घनिष्ट संबंध आहेत,हे पुराव्यानिशी दाखवून दिले,पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत.फडणवीस हे दररोज…

Read More

जव्हार,प्रतिनिधी, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, महाराष्ट्र शासन राज्य पेसा कक्ष पुणे,ग्रामविकास व पंचायतराज विभाग,जिल्हा परिषद पालघर,पंचायत समिती जव्हार पेसा कक्ष आणि ग्रामपंचायत कासटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पेसा कायद्याच्या निर्मितीला २८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे आणि लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या हस्ते झाले.धरतीआबा भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उदघाटन सोहळा पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारचे सहा.गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर…

Read More

सुरेश काटे,तलासरी, जीवनात शिस्तीसोबत सामाजिक शिस्तही महत्वाची – सत्यम गांधी, ज्ञानमाता संस्थेच्या झरी शाळेचा पालक दिन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा काल प्रमुख पाहूणे सत्यम गांधी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदि‌वासी विकास,डहाणू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात सत्यम गांधी यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली व पालकांनी हा कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून न घेता त्यातील सामाजिक बोधही समजून घ्यावा.तसेच प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.वि‌द्याथ्यांनो, जीवनात शिस्ती बरोबरच सामाजिक शिस्तही स्वतःला लावणे गरजेचे आहे.मुलींना खूप शिकवा,असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक फा.निलम लोपीस, झरी गावच्या सरपंच सीना ठाकरे,शाळेच्या प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडीस व मोठया संख्येने पालक आणि विद्यार्थी…

Read More

दिपक मोहिते, लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, वनविभागातील आणखी एक बडा अधिकारी आज लाचलुचपत विभागाने रचलेल्या जाळ्यात अडकला.संदीप तुकाराम चौरे,असे या वनअधिकाऱ्याचे नावं असून तो वनविभागाच्या मांडवी कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत होता.जप्त मिळकतीचा वस्तुस्थितीदर्शक अहवालाचा कागदोपत्री मोबदला म्हणून चौरे याने तक्रारदाराकडून २० लाख रु.च्या लाचेची मागणी केली होती.त्यापैकी १० लाखाची लाच स्विकारताना लाचखोर चौरे एसीबीच्या जाळ्यात सापडला.या कारवाईत एसीबीने चंद्रकांत पाटील व अन्य एका अनोळखी इसमालाही ताब्यात घेतले आहे.यापूर्वीही एसीबीने लाचखोरी प्रकरणात वसईतून वनविभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली होती.या पार्श्वभुमीवर वनविभाग लाचखोरीच्या दलदलीत रुतल्याचे स्पष्ट होत आहे. वसई तालुक्यातील गाव ससुनवघर हद्दीत ‌” विस्तारित सासुपाडा‌,” गावठाण या ठिकाणी…

Read More

दीपक मोहिते, नंडोरे ग्रामपंचायततर्फे पेसा दिन साजरा, आज नंडोरे ग्रामपंचायत मार्फत पेसा दिन साजरा करण्यात आला.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर,सरपंच सोनल घोडके,पेसा अध्यक्ष सुरेंद्र सांबरे,अशोक जाधव,पंचायत समिती सदस्य सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पेसा दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने २४ डिसें.हा दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायत मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आले होते.त्यानुसार जिल्ह्यात पेसा ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन…

Read More

वसंत भोईर,वाडा, उद्घाटन होऊन दहा दिवस लोटले तरी धान खरेदी केंद्र अद्याप बंदच, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी विक्री आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत असते.या केंद्रांचे उद्घाटन गेल्या शनिवार १४ डिसें.रोजी आमदारांच्या उपस्थितीत पार पडले.उद्घाटन होऊन दहा दिवस लाटले तरी या धान खरेदी विक्री केंद्रावर अजून भातखरेदी सुरू झालेली नाही.तसेच बारदानही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.बारदानशिवाय भात विक्री केंद्रावर भात घेतले जात नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी गेल्या कित्येक दिवसापासून बारदानासाठी धान खरेदी केंद्रावर हेलपाटे मारत आहेत.केंद्रचालक मात्र त्यांना जुने फाटलेले बारदान घेऊन जाण्यास सांगत आहेत. नवीन बारदाने येण्याची शक्यता नाही,त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला…

Read More

दीपक मोहिते, २६ डिसें.पासून ३५ वा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव २०२४ ला सुरुवात, वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक यांच्या कला व क्रीडागुणांना वाव मिळावा व त्यांना कला व क्रीडा क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने वसईत दरवर्षी होणारा, वसई तालुका कला क्रीडा महोत्सव गुरु.२६ डिसें.२०२४ ते मंगळ.३१ डिसें.२०२४ या कालावधीत संपन्न होत आहे. यंदाचे कला क्रीडा महोत्सवाचे हे ३५ वे वर्ष आहे.सन १९९० मध्ये लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाप्रमाणे ३५०० स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात या वर्षी कला व क्रीडा विभागात एकूण ५५ हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला…

Read More

संदीप जाधव,बोईसर किराट येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा, जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून किराट गावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात पेसा कायद्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला.प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या परेश बाबुराव पावडे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून ग्रामसभेचे महत्त्व आणि पेसा कायद्याविषयी बहुमोल माहिती दिली. परेश पावडे यांनी आपल्या भाषणात जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले, “आदिवासी समाजाचा वारसा,संस्कृती आणि त्यांचे अधिकार व हक्काचे संरक्षण करणे,हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.पेसा कायदा हा आदिवासींच्या सक्षमीकरणाचा पाया असून, याच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवत विकास साधावा.” पावडे यांनी पेसा कायद्याच्या अंतर्गत ग्रामसभेला असलेले अधिकार,विकासाच्या कामात त्याची भूमिका,आणि गावकऱ्यांच्या सहभागाचे…

Read More

नदीम शेख,पालघर, अवघ्या बारा तासात गुन्हेगार जेरबंद, सफाळे पश्चिमेस आगरवाडी नजीक असलेल्या विळंगी येथे तारा सदानंद भोईर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या १२ तासात जेरबंद करण्यात आले. केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगाने कारवाई करून आरोपींना गजाआड केले. तारा सदानंद भोईर,६५ या आपल्या मोठे घर आळी विळंगी येथे घरात काम करत असताना अनोळखी इसमाने त्यांच्या अंगावर व चेहऱ्यावर कपडा टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ व कानातील कुड्या असा एकूण २ लाख ३१ हजार रु.चे दागिने पळवून नेले.ही चोरी करताना आरोपीने त्यांना मारहाण करून पळ काढला.या घटनेची तक्रार केळवे सागरी पोलीस ठाण्यातमध्ये करण्यात आल्यानंतर गुन्हा…

Read More

दीपक मोहिते, ” साहित्य सहवास, ” ” ख्रिस्तायन २०२४,” चा ऑनलाइन नाताळ अंक प्रकाशित, ” ख्रिस्तायन,” या ऑनलाइन नाताळ अंकाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार पॉल डिमेलो यांच्या हस्ते २३ डिसें.रोजी त्यांच्या तपस्या या राहत्या घरी झाले.याप्रसंगी त्यांनी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देत संपादक मंडळाचे कौतुक केले व यापुढेही सातत्याने प्रकाशन होत राहो, असे मत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. दिवाळी अंकांच्या धर्तीवर नाताळ अंक काढण्याचे धाडस ख्रिस्तोफर मॅथ्यू रिबेलो यांनी “ख्रिस्तायन,” हा अंक २००२ साली छापील स्वरुपात प्रकाशित करून केले होते. पण ई-अंक सोशल मीडिया व मेलद्वारे वितरीत करणे सोपे असल्यामुळे गेली चौदा वर्षे हा अंक ऑनलाइन प्रकाशित होत आहे.पूर्णपणे नाताळ सणानिमित्ताने प्रकाशित…

Read More