- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वाढवण ग्रीनफिल्ड महामार्ग ; भूसंपादनाच्या मोजणीवेळी धारकांनी उपस्थित राहावे, प्रकल्प व्यवस्थापक,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना इकाई,पनवेल या भूसंपादन संस्थेतर्फे वाढवण बंदर प्रकल्पाच्या डहाणू तालुक्यातील प्राप्त झालेल्या भूसंपादन प्रस्तावानुसार सक्षम प्राधिकारी ग्रीनफील्ड महामार्ग ( वाढवण बंदर प्रकल्प ) तथा उपजिल्हाधिकारी ( भुसंपादन ),सुर्या प्रकल्प डहाणू यांच्यातर्फे भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.याबाबत उपअधीक्षक भूमि अभिलेख,डहाणू,यांच्या कार्यालयाकडून संपादनात येणाऱ्या मालमत्तेची ( जमिन, झाडे,बांधकामे,विहीर व बोअरवेल इ.) संयुक्त मोजणीची कार्यवाही करण्यात येणार असून सर्व संबंधितांना त्यांच्या अखेरच्या ज्ञात पत्त्यावर मोजणी नोटीसा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.तसेच नोटीसा न मिळाल्यास याव्दारे सर्व संबंधीत धारक व लगत धारक यांना संयुक्त मोजणीवेळी हजर राहणे बाबत सुचित…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी तलाठ्यातर्फे सातबारावर नोंद करून देण्याची मागणी, शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी धान ( भात,नागली ) खरेदी केली जाते.यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते.ही नोंदणी करताना संबंधित शेतकऱ्याने ई – पीक पाहणी करून घेणे, आवश्यक असते.मात्र अनेक शेतकऱ्यांची मोबाइलद्वारे केली जाणारी ई – पीक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे होवू शकलेली नाही,तर मोबाईलला अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने काही शेतकऱ्यांची ई – पीक पाहणी होवू शकली नाही.अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर तलाठ्यांतर्फे पीक पाहणी नोंद करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून याविषयी राष्ट्रवादीचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी मागण्याचे निवेदन वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना…
संजय नेवे,विक्रमगड, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार, मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी पी.एम.रूम ग्रामीण रुग्णालयमध्ये असणे आवश्यक असते.विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये चार-पाच वर्षांपूर्वी हे शवविच्छेदन कक्ष बांधण्यात आले आहे.परंतु गेल्या चार ते पाच वर्षापासून या कक्षाचा वापरच होत नाही.ते बंद पडून आहे,त्याचा वापर का करण्यात येत नाही,असा सवाल विचारण्यात येत आहे. शवच्छेदन रूम कधी सुरू होणार या शवविच्छेदन रूममध्ये पाणीपुरवठा,लाईट, ड्रेनेज, इ.कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ते सुरू होत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या सोयी व सुविधा कधी मिळणार ? असा प्रश्न या भागातील लोकप्रतिनिधींनी विचारला आहे.मुख्य इमारतीच्या मागील बाजूस तात्पुरता स्वरूपाचे शवविच्छेदन कक्ष उभारण्यात आले आहे.परंतु सार्वजनिक…
दीपक मोहिते, उद्या ३५ मंत्र्यांचा नागपूर येथे शपथविधी, राज्य मंत्रिमंडळाचा उद्या नागपूर येथे विस्तार होत आहे.भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे.या यादीत भाजपचे १५ जणांची नावे आहेत.शिवसेनेचे ( शिंदे गट ) १२ तर राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट ) ८ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.पण या दोन्ही गटाची नावे मात्र अद्याप उघड करण्यात आलेली नाही.भाजपचे देवेंद्र फडणवीस,रविंद्र चव्हाण,नितेश राणे,मंगलप्रभात लोढा,आशिष शेलार,अतुल भातखळकर,शिवेंद्रराजे भोसले,गोपीचंद पडळकर,माधुरी मिसाळ,राधाकृष्ण विखे पाटील,चंद्रशेखर बावनकुळे,संजय कुटे,गिरीश महाजन,जयकुमार रावल,पंकजा मुंडे व अतुल सावे,यांचा समावेश आहे.भाजपने ही नावे निश्चित करून विभागीय समतोल साधला आहे.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा,अतुल भातखळकर व आशिष शेलार यांचा समावेश केला आहे.मुंबई…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी अन्य रुग्णालयात जाण्यास सांगण्यात येते.त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.सध्या वाडा-भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे रुग्णाला अन्य ठिकाणी नेताना मोठे हाल होत असतात. भिवंडी येथे राहणारी गरोदर महिला,आपल्या वाडा तालुक्यात प्रसूतीसाठी आली होती.मात्र प्रचंड प्रमाणात प्रसृती वेदना होऊ लागल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात नेले.तेथे रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिच्या नातेवाईकांना तिला अन्य रुग्णालयात हलवण्यास सांगितले.त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला अन्य रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच महिलेची डिलिव्हरी झाली.त्यामुळे तिला पुन्हा वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले.सुदैवाने ती महिला व बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे.रुग्णालयाचे अधिकारी…
गंगाधर जामनिक,पालघर, धानिवरी आणि धुंदलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन, डहाणूचे आ.विनोद निकोले,ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धानिवरे व धुंदलवाडी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले.यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे,सभापती प्रवीण गवळी,जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,सतीश करबट,शैलेश करमोडा हे उपस्थित होते. स्थानिक लोकप्रतिनिधी,तसेच ग्रामस्थ यांच्याकडून अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करण्यात येत होती.गेल्या वर्षी या दोन्ही आरोग्य केंद्राना मंजुरी मिळाली होती.त्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण पालघर, यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषद एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण…
नवीन पाटील,सफाळे, ” News 27.In Media,” वेबपोर्टल बदलत्या पत्रकारितेचा उगवता सूर्य… आधुनिकतेची कास धरत सध्या सर्वच क्षेत्रात नवनवीन पद्धत अवलंबण्यात येत असताना पत्रकारिता क्षेत्रातही नव्या पर्वाची सुरुवात होत झाली आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ही माध्यम क्षेत्रापुरता मर्यादित न राहता वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आता पत्रकारिता डिजिटल झाली आहे. याच धर्तीवर पालघर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांनी डिजिटल पत्रकारितेत उतरून नव्या पर्वाला सुरवात केली आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेली अनेक दशके आपल्या सडेतोड आणि परखड लेखणीतून प्रशासन राजकीय क्षेत्रात आपला आगळा – वेगळा ठसा उमटवणारे वसई तालुक्यातील जेष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांनी गावकरी,लोकमत, पुढारी,सागर,प्रहार,सारख्या नामवंत दैनिकांतून गेली अनेक दशके…
वसंत भोईर,वाडा ग्रामीण, वाड्यात रात्री कमालीचा गारवा तर दिवसा उन्हाचे चटके, वाडा तालुक्यात सध्या रात्री वातावरणात कमालीचा गारवा पसरत आहे.तर दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत.या अशा वातावरणामुळे आजारपण वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे सध्या विविध आजाराचे आगमन झाले असून दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.रात्री कडाक्याची थंडी पडत असुन यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील नागरिक उबदार कपडे व शेकोटीचा आधार घेत आहेत.तरा दिवसा उन्हाच्या कडक्यापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करत आहेत. यंदा पाऊस मुबलक प्रमाणात पडला असून शेतजमीन काही प्रमाणात ओलसर असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.तसेच तालुक्यातील काही भागात धुकेही पडत आहे.थंडीमुळे ग्रामीण भागातील नागरिक शेकोटी पेटवून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती व माहाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही, निवडणुकीचा निकाल लागून २१ दिवस उलटून गेले तरी राज्यात अद्याप मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही.कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे व कोणती खाती कोणाला द्यायची,यावर एकमत होत नसल्यामुळे मंत्री परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तुटण्याच्या मार्गावर आहे.उद्धव ठाकरे यांची पावले पुन्हा हिंदुत्वाच्या दिशेने पडू लागल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता वेगळ्या चुली मांडण्याच्या तयारीला लागले आहेत.उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले आ.मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या एका ट्विटनंतर सेनेचा छुपा अजेंडा बाहेर आला आहे.भविष्यात महायुतीकडून होणारे कडव्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा अंदाज आल्यानंतर उद्धव ठाकरे आता ” यु…
दीपक मोहिते, महानगरपालिकेतील २९ गावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, वसई – विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणी आलेल्या ३१ हजार ३८९ हरकती व आक्षेपावर येत्या १६ तारखेला सुनावणी सुरू होणार आहे.या सुनावणीनंतर राज्य सरकार या प्रकरणी कोणती भूमिका घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वसई – विरार शहर महानगरपालिकेतील ग्रामीण भागातील एकूण ५५ गावापैकी वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकारने १४ फेब्रुवारी २०२४ मध्ये अधिसूचना जारी केली होती.त्याविरोधात सुमारे ३१ हजार ३८९ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या.राज्य सरकारच्या या अधिसुचने विरोधात दाखल झालेल्या हरकती व घेण्यात आलेल्या आक्षेपावर १६ ते २० डिसें.दरम्यान सहा…
