दीपक मोहिते,
उद्या ३५ मंत्र्यांचा नागपूर येथे शपथविधी,
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या नागपूर येथे विस्तार होत आहे.भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे.या यादीत भाजपचे १५ जणांची नावे आहेत.शिवसेनेचे ( शिंदे गट ) १२ तर राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट ) ८ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.पण या दोन्ही गटाची नावे मात्र अद्याप उघड करण्यात आलेली नाही.भाजपचे देवेंद्र फडणवीस,रविंद्र चव्हाण,नितेश राणे,मंगलप्रभात लोढा,आशिष शेलार,अतुल भातखळकर,शिवेंद्रराजे भोसले,गोपीचंद पडळकर,माधुरी मिसाळ,राधाकृष्ण विखे पाटील,चंद्रशेखर बावनकुळे,संजय कुटे,गिरीश महाजन,जयकुमार रावल,पंकजा मुंडे व अतुल सावे,यांचा समावेश आहे.भाजपने ही नावे निश्चित करून विभागीय समतोल साधला आहे.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा,अतुल भातखळकर व आशिष शेलार यांचा समावेश केला आहे.मुंबई – ०३,प.महाराष्ट्र -०४,कोकण – ०२,विदर्भ – ०२,उ.महाराष्ट्र -०२ व मराठवाडा – ०२,असे एकूण १५ जणांना संधी देण्यात आली आहे.शिंदे गटाकडून,भरत गोगावले,उदय सामंत,तानाजी सावंत,शंभूराज देसाई,दादा भुसे,गुलाबराव पाटील,प्रताप सरनाईक,अर्जुन खोतकर,भावना गवळी,मंगेश कुडाळकर,प्रकाश आबिटकर व राजेश क्षीरसागर अशी बारा जणांची नावे आहेत.नव्या मंत्रिमंडळात शिंदे गटाने दीपक केसरकर व अब्दुल सत्तार या दोघांना यावेळी डच्चू देण्यात येणार आहे.हे दोघेही अनेक प्रकरणी वादग्रस्त ठरल्यामुळे त्यांना यंदा बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.अजित पवार गटाचे छगन भुजबळ,आदिती तटकरे,संजय बनसोडे,अजित पवार,मकरंद पाटील,नरहरी झिरवळ व धनंजय मुंडे हे आठ जण उद्या शपथ घेतील.नरहरी झिरवळ यांना आदिवासी विकासमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे.मंत्रिमंडळाच्या पहिल्या फेरीत एकूण ३५ मंत्र्यांचा समावेश असेल,त्यानंतर दुसऱ्या फेरीत ८ मंत्र्यांना असे एकूण ४३ मंत्री असतील.

