वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर,
वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी अन्य रुग्णालयात जाण्यास सांगण्यात येते.त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.सध्या वाडा-भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे रुग्णाला अन्य ठिकाणी नेताना मोठे हाल होत असतात.
भिवंडी येथे राहणारी गरोदर महिला,आपल्या वाडा तालुक्यात प्रसूतीसाठी आली होती.मात्र प्रचंड प्रमाणात प्रसृती वेदना होऊ लागल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात नेले.तेथे रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिच्या नातेवाईकांना तिला अन्य रुग्णालयात हलवण्यास सांगितले.त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला अन्य रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच महिलेची डिलिव्हरी झाली.त्यामुळे तिला पुन्हा वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले.सुदैवाने ती महिला व बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे.रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या महिला व बाळाच्या जीवितास धोका झाला असता,त्यामुळे गावकऱ्यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी,अशी मागणी केली आहे.

