गंगाधर जामनिक,पालघर,
धानिवरी आणि धुंदलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन,
डहाणूचे आ.विनोद निकोले,ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धानिवरे व धुंदलवाडी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले.यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे,सभापती प्रवीण गवळी,जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,सतीश करबट,शैलेश करमोडा हे उपस्थित होते.
स्थानिक लोकप्रतिनिधी,तसेच ग्रामस्थ यांच्याकडून अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करण्यात येत होती.गेल्या वर्षी या दोन्ही आरोग्य केंद्राना मंजुरी मिळाली होती.त्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण पालघर, यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषद एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी पालघर, यांच्या आदेशानुसार या आरोग्य केंद्राना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला १ कोटी ४३ लाख रु. प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.हे उपकेंद्र येत्या सहा महिन्यात उभरण्यात येणार असून येत्या जूनपासून जनतेला याचा लाभ घेता येईल,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी दिली.या वास्तूत प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय कक्ष,औषध निर्माण अधिकारी कक्ष,स्त्री कक्ष पुरुष कक्ष,लॅबोरेटरी,इमर्जन्सी कक्ष, कॅन्टीन,अशा वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांना या आरोग्य केंद्राचा लाभ मिळणार आहे.
धानिवरी गावाची लोकसंख्या असून पंचक्रोशीतील ०२ व धुंडलवाडी गावात १४ हजार ७५० इतकी असून ०२ ग्रा.पं.चा समावेश आहे,तर धुंदलवाडी गावची लोकसंख्या ५५ हजार इतकी असून ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य, सरपंच,जागेचे मालक, उपसरपंच,ग्रामसेवक,पोलीस पाटील,वैद्यकीय अधिकारी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

