दीपक मोहिते,
वाढवण ग्रीनफिल्ड महामार्ग ; भूसंपादनाच्या मोजणीवेळी धारकांनी उपस्थित राहावे,
प्रकल्प व्यवस्थापक,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना इकाई,पनवेल या भूसंपादन संस्थेतर्फे वाढवण बंदर प्रकल्पाच्या डहाणू तालुक्यातील प्राप्त झालेल्या भूसंपादन प्रस्तावानुसार सक्षम प्राधिकारी ग्रीनफील्ड महामार्ग ( वाढवण बंदर प्रकल्प ) तथा उपजिल्हाधिकारी ( भुसंपादन ),सुर्या प्रकल्प डहाणू यांच्यातर्फे भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.याबाबत उपअधीक्षक भूमि अभिलेख,डहाणू,यांच्या कार्यालयाकडून संपादनात येणाऱ्या मालमत्तेची ( जमिन, झाडे,बांधकामे,विहीर व बोअरवेल इ.) संयुक्त मोजणीची कार्यवाही करण्यात येणार असून सर्व संबंधितांना त्यांच्या अखेरच्या ज्ञात पत्त्यावर मोजणी नोटीसा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.तसेच नोटीसा न मिळाल्यास याव्दारे सर्व संबंधीत धारक व लगत धारक यांना संयुक्त मोजणीवेळी हजर राहणे बाबत सुचित करण्यात येत आहे.
मोजणीची कार्यवाही करण्यात येणाऱ्या गावाचे नाव,मोजणी, दिनांक,मोजणीदाराचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-२) घोळ १६ डिसें.२०२४ स्नेहा दवणे-८०९७३५८८५२, २) धामटणे १६ डिसें.
२०२४,सुयश खंडागळे-९०४९९०६२८२, ३) कोलवली १६ डिसें.२०२४,भूषण गिरासे- ९४०४७४२१७३,४) कोल्हाण १६ डिसें.२०२४,सचिन डवला-९२८४१८५२६०, ५) वाणगाव १६ डिसें.२०२४ निता शेंडे-९५७९३७७०६५, ६) तवा – १८ डिसें.२०२४ निता शेंड-९५७९३७७०६५,अशी आहे.त्याकरीता संबधीत धारक व लगत धारक यांना संयुक्त मोजणीवेळी सदर तारखेस गैरहजर राहिल्यास आपले अनुपस्थितीत संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण केली जाईल व याबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही,याची नोंद घ्यावी,असे प्रकल्प व्यवस्थापक,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना इकाई,पनवेल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळवले आहे.

