वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
वाड्यात रात्री कमालीचा गारवा तर दिवसा उन्हाचे चटके,
वाडा तालुक्यात सध्या रात्री वातावरणात कमालीचा गारवा पसरत आहे.तर दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत.या अशा वातावरणामुळे आजारपण वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे सध्या विविध आजाराचे आगमन झाले असून दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.रात्री कडाक्याची थंडी पडत असुन यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील नागरिक उबदार कपडे व शेकोटीचा आधार घेत आहेत.तरा दिवसा उन्हाच्या कडक्यापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करत आहेत.
यंदा पाऊस मुबलक प्रमाणात पडला असून शेतजमीन काही प्रमाणात ओलसर असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.तसेच तालुक्यातील काही भागात धुकेही पडत आहे.थंडीमुळे ग्रामीण भागातील नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून आपला बचाव करतांना पाहायला मिळत आहेत.तर सकाळी सूर्य माथ्यावर आला कि,उन्हाचे चटके सथ्या नागरीकांना सहन करावे लागत आहेत.
वातावरणातील सततच्या बदलामुळे आरोग्याच्या तक्रारीमध्ये ही वाढ झाली आहे.विशेष, ताप,खोकला व फ्लू यांसारखे आजार डोके वर काढू लागले आहेत.जाने.महिन्याच्या अखेरपर्यंत असे वातावरण राहील,असे ज्येष्ठ नागरीकाकडून सांगण्यात येत आहे.या अशा वातावरणामुळे सकाळी मॉर्निंग वॉक ला घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच रोडावली आहे.

