वसंत भोईर,वाडा ग्रामीण,
शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी तलाठ्यातर्फे सातबारावर नोंद करून देण्याची मागणी,
शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी धान ( भात,नागली ) खरेदी केली जाते.यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते.ही नोंदणी करताना संबंधित शेतकऱ्याने ई – पीक पाहणी करून घेणे, आवश्यक असते.मात्र अनेक शेतकऱ्यांची मोबाइलद्वारे केली जाणारी ई – पीक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे होवू शकलेली नाही,तर मोबाईलला अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने काही शेतकऱ्यांची ई – पीक पाहणी होवू शकली नाही.अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर तलाठ्यांतर्फे पीक पाहणी नोंद करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून याविषयी राष्ट्रवादीचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी मागण्याचे निवेदन वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले आहे.

