Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीचे पुढील लक्ष्य मुंबई,ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल २१ दिवसांनी काल राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले.महायुतीमध्ये सलग १५ ते १६ दिवस जोरदार धमासान झाल्यानंतर कोणाला किती मंत्रिपदे,यावर कशीबशी तडजोड झाली.शिंदे गटातील वाचाळ मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपने यावेळी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती व त्यांच्या गटाचे अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,तानाजी सावंत यांना बाहेरचा रस्ता दाखवला.तर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे,त्रासदायक ठरले.दुसरे एक नेते दिलीप वळसे पाटील,यांचे आजारपण व वाढते वय,अशी दोन कारणे पुढे करत,त्यांनाही घरी बसवण्यात आले. मंत्रिमंडळाची रचना करताना भाजपने अतिशय धूर्त खेळी केल्याचे दिसून…

Read More

दीपक मोहिते, महायुती सरकारने पालघर जिल्ह्यावर पुन्हा अन्याय केला, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महायुतीने पालघर जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत.पालघर जिल्ह्यात महायुतीचे एकूण पाच आमदार निवडून आले आहेत.त्यापैकी स्नेहा दुबे पंडित,राजन नाईक व हरिश्चंद्र भोये हे तिघे नवखे आहेत.पण राजेंद्र गावित किंवा विलास तरे या दोघांपैकी एकाला संधी मिळेल,अशी पालघरवासियांची अपेक्षा होती,पण हे दोघे शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आले आहेत.त्यांना मंत्रिपद दिल्यास या जिल्ह्यावर निर्माण झालेले आपले वर्चस्व कालांतराने धोक्यात येईल,त्यामुळे त्यांनी पालघर जिल्ह्याला डावलले.याप्रकरणी शिंदे गटाचे एकमात्र चालले नाही. पालघर जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले असताना,त्यांच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची होती,परंतु राजकीय हाराकिरीमध्ये शिंदे…

Read More

दीपक मोहिते, मंत्रिमंडळाचे घोडं अखेर गंगेत न्हालं, नव्या मंत्रिमंडळाचा आज नागपूर येथे शपथविधी पार पडला.आज एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली,त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.पण या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ भाजपच ” सबकुछ,” अशी स्थिती होती.गणेश नाईक व पंकजा मुंडे या दोघांचे प्रदीर्घ वनवासानंतर पुन्हा एकदा पुनर्वसन झाले.मात्र भाजपच्या गोतावळ्यात सुधीर मुनगुंटीवार व रविंद्र चव्हाण मात्र पाहायला मिळाले नाहीत.त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.पण सुधीर मुनगुंटीवार यांना नारळ देण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सुरुवातीला भाजपच्या १५ जणांना मंत्रिपदे मिळणार,असे ठरले असताना ती संख्या १९ पर्यंत वाढवण्यात आली व अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.शिंदे गटाचे अब्दुल सत्तार,दीपक…

Read More

संजय लांडगे,वाडा शहर, जळलेल्या भाताच्या भाऱ्यांची आमदारांनी केली पाहणी, वाडा तालुक्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताच्या भाऱ्याच्या उडव्यांना अज्ञाताने आग लावण्याची घटना काल घडली होती.या घटनेची माहिती आ.शांताराम मोरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.मात्र पंचनामा करण्यासाठी जागेवर कुठलाही अधिकारी पोहोचला नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. जामघर येथे शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताची भारे रचून ठेवण्यात आले होते.अज्ञात इसमाने पाचशेहून अधिक भारे जाळले होते.या घटनेमध्ये किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील,या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.आज आ.शांताराम मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.मात्र दोन दिवसांपासून घटनास्थळी एकही अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहोचला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी…

Read More

संजय लांडगे, वाडा येथे महिलांसाठी कर्करोग तपासणी व निदान शिबीर संपन्न, रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊनटाऊन सीलॅण्ड,डॉ. कॅप्टन रितू बियानी ( संस्थापक कर्करोग संस्था, पुणे) व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथे आज परिसरातील महिला वर्गासाठी मोफत कर्करोग तपासणी आणि निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जगभरात महिला वर्गामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे.याबाबत महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळून या गंभीर आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.कर्करोगाचे वेळेत निदान होणे आणि योग्य उपचार पद्धती घेणे,अशी दक्षता घेतल्यास या दुर्धर आजारावर मात करणे, सहजशक्य आहे. महिलावर्गामध्ये हेच प्रबोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू आणि ज्येष्ठ…

Read More

सुधीर केदारे,इगतपुरी, कै.मधुकरराव पिचड ; आदिवासी विकासाचे शिल्पकार कै.मधुकरराव पिचड यांना आपल्यातून जाऊन १० दिवस झाले असले तरी त्यांचे कार्य, विचार,आणि योगदान यांचा ठसा समाजावर सदैव कायम राहील.पिचड हे केवळ राजकारणी नव्हते तर ते समाजसेवेचे प्रतिक होते. त्यांनी आयुष्यभरात आदिवासी,गोरगरीब,आणि वंचित घटकांसाठी झटून कार्य केले. मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्राच्या माजी आदिवासी विकासमंत्री म्हणून राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले.त्यांच्यामुळे आदिवासी समाजाला नवी दिशा मिळाली आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला. त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम करताना आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेटला मंजुरी मिळवली. आदिवासी समाजाच्या गरजा आणि प्रगतीची कवाडे उघडली गेली.ज्यामुळे अनेक विकासप्रकल्प राबवणे शक्य झाले. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” एकनाथ शिंदे यांची खरोखर दया येते हो …. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर आता त्यांचा मुक्कामही ” वर्षा,” या सरकारी निवासस्थानाहून ” मुक्तागिरी,” या बंगल्यात हलवण्यात आला आहे.नियमाप्रमाणे त्यांना ते निवासस्थान सोडावे लागणारच होते,काल त्यांचे सामान हलवण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांशी खूप जवळीक साधली होती.ते उठसूठ दिल्लीला जात असत.मोदी व शहा हे दोघे मुंबईत आले की हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत असत.त्यांच्या या प्रेमाने शिंदेही गहिवरून जात असायचे.पण त्या बिचाऱ्या शिंदेंना कुठे माहीत होते की हे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्याची वाटचाल अधोगतीच्या दिशेने… आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.कोणाला संधी व कोणाला डच्चू मिळणार ? याविषयी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.१५.१२.८ असे सूत्र ठरले असून महायुतीमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना मान्य आहे. आज नागपूर येथे राजभवनावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन वाईट घटनांचे सावट पडले आहे.परभणी येथे भारतीय संविधानाचा झालेला अपमान व त्यानंतर झालेली दंगल,तसेच बीड येथे सरपंच संतोष देशमुख,या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे झालेली हत्या.या हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे हे वाचवत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.या दोन्ही घटनांना आता जातीय राजकारणाचा रंग देण्यात येत आहे.संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येबाबत स्थानिक आ.सुरेश धस यांनी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे आर्टिस्ट कॅम्पचे यशस्वी आयोजन, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कला अकादमीतर्फे महापालिकेच्या कलाशिक्षक व ख्यातनाम चित्रकारांच्या सहकार्याने जव्हार व परिसरात ११ ते १४ डिसेंबर २०२४ अश्या चार दिवसांचा भव्य आर्टिस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पच्या माध्यमातून स्थानिक वारसा,ग्रामीण सौंदर्य,तसेच आदिवासी जीवनशैलीला कला माध्यमातून अधोरेखित करण्यात आले. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे आणि अजय वाणी यांनी भेट देऊन कलाशिक्षक व चित्रकारांनी साकारलेल्या कलाकृतींची पाहणी केली. जय विलास पॅलेस,हनुमान पॉइंट,शिरपामाळ,जव्हार बाजार,के.व्ही.हायस्कूल व गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार,तसेच वारली चित्रशैलीतील विविध कलाकृतींनी या कॅम्पची शोभा वाढवली.पाहणीदरम्यान उपशिक्षणाधिकाऱ्यांनी कलाकारांचे कौतुक केले.या कॅम्पमध्ये स्थानिक वारली कलाकार…

Read More

संजय लांडगे, वाडा शहर, वाडा येथे भाताच्या भाऱ्यांना अज्ञात व्यक्तीने लावली आग, वाडा तालुक्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खळ्यामध्ये भाताच्या भाऱ्यांना अज्ञात इसमाने आग लावण्याची घटना आज दुपारच्या सुमारात घडली आहे. या घटनेत पाचशेच्यावर भाताचे भारे जळून खाक झाले.किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील,या दोन शेतकऱ्यांचे लाखो रु.चे नुकसान झाले आहे.याबाबत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना पंचनामा करण्यासाठी कळवण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.या तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भात शेतीचा व्यवसाय करत असतात. वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हे शेतकरी भात लागवड करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतात.आज दुपारी अज्ञात इसमाने भाताचे…

Read More