- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
Author: दीपक मोहिते
अनंत भोईर,पालघर, राष्ट्रीय जलजीवन मिशनचे अति.सचिव तथा अभियान संचालकांनी दोन गावांची केली पहाणी, राष्ट्रीय जल जीवन मिशनचे अति.सचिव तथा अभियान संचालक,जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार व राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ई.रविंद्रन यांनी पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत गांजे- ढेकाळे व डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत तवा या गावातील पेठ जलजीवन मिशन योजनेच्या कामाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी करून सरपंच, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती व गावकरी,यांच्याशी संवाद साधून योजनेचे महत्व पटवून दिले. प्रत्येक कुटूंबाला ५५ लिटर प्रति व्यक्ती शुद्ध नियमित पाणी पुरवठा करणे,आवश्यक आहे.यासाठी योजना पुर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीने नियोजन करून योजनेचे…
अनंत भोईर,पालघर, पालघर येथे उद्योजकांसाठी जिल्हा उद्योगमित्र समिती सभेचे आयोजन, राज्यात उद्योगधंद्याचे विकेंद्रिकरण व उद्योगधंद्यासाठी संतुलीत वाढ हा राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणांचा मुख्य गाभा आहे.राज्यामधील गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. उत्सुक उद्योजकांना विविध प्रकारचे संविधानिक परवाने, वीज,आर्थिक सहाय्य,इ. मिळवण्याकरीता प्रशासनाकडून मदत करण्यात येत आहे.त्यास अनुसरुन जिल्ह्यातील पालघर-तारापूर, वाडा,डहाणू,तलासरी, विक्रमगड,जव्हार-मोखाडा,या तालुक्यातील उद्योजकांसाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याकरीता सर्व विशेष जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेचे आयोजन उद्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय, कोळगांव,जि.पालघर येथे करण्यात आले आहे.सदर सभेस उद्योग व्यवसायाशी संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी,पोलीस विभाग,एमपीसीबी, एमआयडीसी,औद्योगिक सुरक्षा,कामगार,महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग ( जि.प. ),अग्रणी बँक,इ. विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या परिसरातील औद्योगिक संघटना,उद्योजक,…
शुभम सावंत,विरार, मनपा मुख्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न,२६ जाने.पर्यंत प्रदर्शन खुले राहणार, वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ भारत अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून काल रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ” मी स्वच्छ अभियानामध्ये सहभागी होईन,आपले शहर स्वच्छ ठेवीन,” असे घोषवाक्य देण्यात आले होते. वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन फित कापून केले आणि काढण्यात आलेल्या रांगोळ्यांची पाहणी केली. यावेळी समाजात सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्या होत्या.महाराष्ट्र राज्यात वाढती दहशत,महिलांवर वाढते अत्याचार, शहरातील दूषित प्रदूषण, झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल,पाण्याचा वाढता दुरुपयोग,वाढते आजार,शहरातील अस्वच्छ ठिकाणे,अशा रांगोळ्या आकर्षणाचे केंद्रबिंदू…
नदीम शेख,पालघर, उठाबशाच्या शिक्षेमुळे अत्यवस्थ झालेली विद्यार्थीनी रुग्णालयात दाखल, शाळेत येण्यास पाच मिनिट उशीर झाला म्हणून मुख्याध्यापिकाने एका विद्यार्थिनीला उठाबशा काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला आहे. पालघरच्या भगिनी समाज शाळेतील ही घटना असून उठाबशा काढल्यामुळे विद्यार्थिनीला उलट्या मळमळ,पोटात दुखू लागल्याने दहावीत शिकणाऱ्या द्विता विनोद पाटील या विद्यार्थिनीला पालघरच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. पालघर शहरातील भगिनी समाज विद्यालयातील दहावी इयत्तेत शिकणारी पालघर ( टेंभोडे ) येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीला दोन दिवसापूर्वी सकाळी शाळेत येण्यास विलंब झाला.त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला उठाबशा काढायला लावल्या. उठाबशा काढल्यानंतर त्या मुलीच्या पायात व मांड्यांमध्ये गोळे आले व पोटदुखीचा त्रास सुरू झाला.त्यानंतर काही वेळाने…
दीपक मोहिते, ” चोराच्या उलट्या बोंबा,” धनंजय मुंडे यांचे ट्विट : ” शैतानाच्या तोंडी बायबल,” काल राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाच्या शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनाला महाराष्ट्राचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले.त्यांनी केलेल्या एका ट्विटमधील मजकूर वाचून भल्याभल्यांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला.ते आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले ते पहा जरा,ते म्हणाले, स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर झालेला मीडिया ट्रायल,समाजमाध्यमावर झालेली चिखलफेक व काही लोकांनी साधलेले राजकारण,अशा अनेक गोष्टींमुळे जिल्ह्याचे ऐक्य धोक्यात आले आहे.आपला पक्ष हा शिव,शाहू,फुले व आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे.त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल.ऊसतोड,कष्ट…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीमध्ये धमासान सुरु झालंय… महायुतीमध्ये सध्या जे काही सुरू झाले आहे,ते पाहता भावी काळात महायुतीमध्ये काहीही घडू शकते.शिंदे यांचे वारंवार रुसणे व गावी जाऊन बसणे,अशा वागण्यामुळे भाजप देखील आता सर्जिकल स्टाईक करण्याच्या तयारीला लागला आहॆ.त्यासाठी भाजपकडून नवीन उदयाला संधी मिळण्याची शक्यता आहॆ.या सर्व घडामोडीमुळे महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आता सोप्या राहिलेल्या नाहीत.शिंदे यांचा रुसवा व महायुतीमधील अज्ञात शक्तीकडून अजित पवार यांची कोंडी करण्याचे होत असलेले जाणीवपूर्वक प्रयत्न,त्यामुळे या दोन्ही गटाचे मंत्री,आमदार,खासदार प्रचंड तणावाखाली आले आहेत. मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्यापासून मंत्रिमंडळात आपल्याला योग्य वाटा न मिळणे,खातेवाटपात झालेला अन्याय व आता पालकमंत्रीपदे वाटप,यामुळे एकनाथ शिंदे यांची अवस्था “…
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द गाजणार, अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा व त्यांच्यासोबत जेडी वेन्स यांनी पहिल्यांदा उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून अत्यंत कमी फरकाने पराभूत झालेल्या ट्रम्पने या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा शेवटच्या टप्यात ७० मतांनी पराभव केला.या लढतीत ट्रम्प यांना २९३ तर हॅरिस यांना २२३ मते मिळाली.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यासाठी बहुमताचा २७० हा आकडा गाठावा लागतो.या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यापासून हॅरिस या ट्रम्प यांच्या वाढत्या मतांचा आकडा शेवटपर्यंत गाठू शकल्या नाहीत. शपथविधी झाल्यानंतर ट्रम्प यांनी,आपल्या पहिल्या वहिल्या भाषणात आपण “…
जव्हार प्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळा काळीधोंड इमारतीचे उद्घाटन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत महाराष्ट्रात ४७७ शाळांची निवड झाली.यामध्ये जिल्हा परिषद काळीधोंड शाळेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड झाली.या शाळेत पटसंख्या सतत वाढत गेली व प्रज्ञाशोध परीक्षेत २०१९ पासून सतत गुणवत्ता यादीत मुले झळकली.त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बोरसे व माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे खरपडे यांनी सतत पाठपुरावा केला.त्यामुळे महाराष्ट्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषद शाळा काळीधोंड शाळेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत दखल घेतली. त्यानंतर समितीने अनेक भौतिक सुविधाबाबत पाठपुरावा केला.या शाळेची पटसंख्या ३५७ असून एकूण वर्ग पहिली…
अनिल विचारे,विरार पूर्व, मॅरेथॉन स्पर्धा : छायाचित्रण स्पर्धेत राकेश रावल अव्वल, वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित गेल्या ८ डिसें.२०२४ रोजी झालेल्या १२ व्या राष्ट्रीय वसई विरार शहर महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धमधील छायाचित्रण स्पर्धा निकाल खालीलप्रमाणे लागला आहे. राकेश रावल या छायाचित्रकाराने प्रथम क्रमांक पटकावला आहॆ. प्रथम क्रमांक ( रू.१५०००/- व सन्मानचिन्ह ) राकेश रावल, द्वितीय क्रमांक ( रू.१००००/- व सन्मानचिन्ह )राजेंद्र तुपे. तृतीय क्रमांक ( रू.५०००/- व सन्मानचिन्ह ) शिवराज वैद्य उत्तेजनार्थ-१ ( सन्मानचिन्ह) नितिन लवाटे, उत्तेजनार्थ-२ (सन्मानचिन्ह ) श्री.मनहर खत्री, छायाचित्रण स्पर्धेचा बक्षिस समारंभाची तारीख व दिनांक स्वतंत्ररित्या क्रीडा विभागामार्फत प्रसिद्धी करण्यात येणार आहॆ. क्री
चोरी, लुटमार करणाऱ्या चौकडीला वाडा पोलिसांनी केली अटक वाडा भिवंडी महामार्गावर आयशर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौकडीला सि.सि.टि.व्ही.कॅमेऱ्याच्या मदतीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघाना वाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त केले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबरनाथ हून आलेला टेम्पो आबिटघरला जात असताना रात्रीच्या सुमारास वाडा तालुक्यातील शिरीषपाडा येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या आयशर टेम्पो चालकावर चाकूने वार करून त्याच्याकडून पाच हजार रू व एक ओपो कंपनीचा मोबाईल घेऊन हे चोरटे पसार झाले होते.पुढे आणखी एका ठिकाणी चोरी करत असताना स्थानिक नागरिकांनी दोघांना पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.यावेळी अन्य दोघेजण पळून गेले होते,त्यांना शहापूर तालुक्यातील कांदळी येथून…
