जव्हार प्रतिनिधी,
जिल्हा परिषद शाळा काळीधोंड इमारतीचे उद्घाटन
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत महाराष्ट्रात ४७७ शाळांची निवड झाली.यामध्ये जिल्हा परिषद काळीधोंड शाळेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड झाली.या शाळेत पटसंख्या सतत वाढत गेली व प्रज्ञाशोध परीक्षेत २०१९ पासून सतत गुणवत्ता यादीत मुले झळकली.त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बोरसे व माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे खरपडे यांनी सतत पाठपुरावा केला.त्यामुळे महाराष्ट्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषद शाळा काळीधोंड शाळेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत दखल घेतली.
त्यानंतर समितीने अनेक भौतिक सुविधाबाबत पाठपुरावा केला.या शाळेची पटसंख्या ३५७ असून एकूण वर्ग पहिली ते दहावीपर्यंत चालतात.अशा या गुणवत्ताधारक शाळेकडे शासनाचे लक्ष गेले आणि इमारत मंजूर झाली. इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी या शाळेचे पदवीधर शिक्षक भाऊसाहेब शेटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.शेटे यांनी कार्यक्रमांची प्रस्तावना केली.
या आदर्श इमारतीचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण खरपडे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरी बोरसे,जुनी जव्हार सरपंच निलेश भोये उपसरपंच संजय भोये यांनी केले.
इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरी बोरसे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे श्रावण खरपडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

