चोरी, लुटमार करणाऱ्या चौकडीला वाडा पोलिसांनी केली अटक
वाडा भिवंडी महामार्गावर आयशर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौकडीला सि.सि.टि.व्ही.कॅमेऱ्याच्या मदतीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघाना वाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त केले आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबरनाथ हून आलेला टेम्पो आबिटघरला जात असताना रात्रीच्या सुमारास वाडा तालुक्यातील शिरीषपाडा येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या आयशर टेम्पो चालकावर चाकूने वार करून त्याच्याकडून पाच हजार रू व एक ओपो कंपनीचा मोबाईल घेऊन हे चोरटे पसार झाले होते.पुढे आणखी एका ठिकाणी चोरी करत असताना स्थानिक नागरिकांनी दोघांना पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.यावेळी अन्य दोघेजण पळून गेले होते,त्यांना शहापूर तालुक्यातील कांदळी येथून अटक केली आहे.
मोबाईल चोरी,चाकूचा धाक दाखवून लुटाने,चाकूने वार करणे इ.गुन्ह्यासाठी गणेश भिम जाधव, ( रा.कांदळी ),सनी मोकाशी ( रा. तुसे ),नितीन रावते ( रा. कुईलू ) व प्रकाश मोर ( रा.सावरखांड )
यांना तात्काळ वाडा पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
उपरोक्त कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने केली.याप्रकरणी अधिक तपास पो.उ.नि.मयुरेश अंबाजी करत आहेत.

